महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमूळेच 25 कोटीचा निधी "अखर्चित' : एकनाथ खडसे

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमूळेच 25 कोटीचा निधी "अखर्चित' : एकनाथ खडसे

जळगाव ः तीस-चाळीस वर्षापासून नगरपालिका व महापालिकेच्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे काम त्यांचे नाही ते करून ठेवले. घोटाळे करून जळगावकरांच्या डोक्‍यावर कर्ज करून ठेवले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले 25 कोटीचा निधी देखील ते अद्याप खर्च करू शकले नाहीत असा आरोप आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला. 

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला पाच दिवस शिल्लक असतांना आज खडसे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत. सकाळी प्रभाग 12 उमेदवारांचे कार्यालयाचे उद्‌घाटन करून प्रचाराला सुरवात झाली. तसेच सायंकाळी सहा नंतर प्रभाग बारा, प्रभाग 15, प्रभाग 14 येथील भाजपच्या उमेदवारांच्या प्राचाराची कॉर्नर सभा झाल्या. यावेळी आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, मच्छिंद्र पाटील, सुनील नेवे, आत्माराम महाजन आदी पदाधिकारी उपस्थित 
होते. 

वाघूरचे श्रेय दुसऱ्यांनी लाटले 
जळगाव शहराला पाणी मिळावे यासाठी मी शासनाकडून वाघूर धरण योजना मंजूर करून आणली. मात्र मनपातील सत्ताधाऱ्यांनी या योजनेचे श्रेय घेतले. त्यातच निष्कृष्ट दर्जाची जलवाहिनी टाकून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सतरा मजली इमारतीचे कर्ज नागरिकांवर 
राज्यातील इतर महापालिकेच्या इमारती सतरा मजली नाहीत,एवढी मोठी इमारत बांधून त्यांनी जळगावच्या नागरिकांवर कर्ज करून ठेवल्याचे खडसे यांनी सांगितले. विमानतळ देखील सहकाराने बांधायला हवे होते, जे करायला हवे होते ते न करता अन्य ठिकाणी पैसे खर्च करून आज जळगावकरांना अडचणीत आणल्याचे ते म्हणाले. मनपातील वाईट गोष्टींना भाजपच्या नगरसेवकांनी वेळोवेळी विरोध केला असल्याचे ते म्हणाले. 

खाविआचे माजी नगरसेवक भाजपमध्ये 
खानदेश विकास आघाडीचे नगरसेवक इक्‍बाल पिरजादे यांनी मेहरुण मध्ये झालेल्या सभेत खडसेंचा सत्कार केला. व भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपच्या गटात आले. यावेळी खडसेंनी पिरजादे यांचे स्वागत केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com