महापालिकेत 40 जण प्रथमच सदस्य! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जळगाव ः स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून राजकारणाची सुरवात होत असते. पण, निवडणुकीत पक्षाकडून जुन्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, महापालिकेत निवडून आलेले 75 पैकी 40 जण प्रथमच नगरसेवक म्हणून काम सांभाळणार आहेत. यामुळे हे उमेदवार महापालिकेच्या सभागृहात प्रथमच प्रवेश करतील. 

महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह एमआयएम, अपक्ष उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेकडून बहुतांश उमेदवार जुनेच होते. तरीदेखील शिवसेनेच्या निवडून आलेल्या 15 जणांमधील चार नवीन चेहरे आहेत. याउलट भाजपकडून नवीन चेहऱ्यांनाच संधी देण्यात आली. भाजपचे सर्व प्रभागांतून 75 उमेदवार रिंगणात होते. यात 57 जणांना विजय मिळाला असून, यामधील 33 जण नवीन आहेत. म्हणजेच नव्या चेहऱ्यांना घेऊन भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली आहे. 
 
असे आहेत नवीन निवडून आलेले उमेदवार 

भाजप ः प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुक्‍सानाबी खान, कांचन सोनवणे, मीना सपकाळे, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे, चेतना चौधरी, मुकुंदा सोनवणे, अमित काळे, मंगला चौधरी, धीरज सोनवणे, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, चंद्रशेखर पाटील, मयूर कापसे, विजय पाटील, हसिनाबी शेख, कुलभूषण पाटील, गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, अंजना सोनवणे, सुरेखा सोनवणे, राजेंद्र पाटील, रजनी अत्तरदे, रेश्‍मा काळे, मनोज आहुजा, मीनाक्षी पाटील, रंजना वानखेडे, सुनील खडके, विश्‍वानाथ खडके. 
एमआयएम ः रियाज बागवान, सुन्नाबी देशमुख, सईदा शेख. 
शिवसेना ः शबानाबी खाटीक, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे. 

Web Title: marathi news jalgaon election 40 news candidate