भाजपमधील जुन्यांचे बळी; प्रवेशाची कोणती "राजकीय खेळी'! 

कैलास शिंदे
सोमवार, 9 जुलै 2018

जळगाव : भाजप आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी- शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. भाजपमधून त्याला जोरदार विरोध होत असतानाच, पक्षात विरोधी गटातील नगरसेवकांचा प्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विरोधात अस्वस्थता वाढण्याऐवजी भाजपमध्येच अधिक दिसून येत असून, यामागे विरोधकांचीच ही "खेळी' आहे की काय? अशी साशंकता भाजपमधील कार्यकर्त्यांना येत आहे. त्यांचा पहिला "धमाका' भाजपमधील महिला पदाधिकाऱ्यांनी आज केला. 

जळगाव : भाजप आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी- शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. भाजपमधून त्याला जोरदार विरोध होत असतानाच, पक्षात विरोधी गटातील नगरसेवकांचा प्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विरोधात अस्वस्थता वाढण्याऐवजी भाजपमध्येच अधिक दिसून येत असून, यामागे विरोधकांचीच ही "खेळी' आहे की काय? अशी साशंकता भाजपमधील कार्यकर्त्यांना येत आहे. त्यांचा पहिला "धमाका' भाजपमधील महिला पदाधिकाऱ्यांनी आज केला. 
निवडणूक जाहीर झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याची घोषणा केली; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने संघर्ष केलेल्या महापालिकेतील सत्ताधारी जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाशी युती करण्याची घोषणा केली. त्याला भाजपमधील कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. 

असंतोषाची नांदी...! 
युती होईल की नाही, याबाबत साशंकता असतानाच गेल्या दोन दिवसांपासून भाजपमध्ये विरोधी नगरसेवकांचा प्रवेश करण्याचा ओघ वाढला आहे. आज तर थेट जैन यांच्या गटासोबत असलेले महापौर ललित कोल्हे यांनी काही नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपमधील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे; परंतु भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले. महिला पदाधिकाऱ्यांनी तर जाहीरपणे आपले मत व्यक्त करून आमदार सुरेश भोळे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपमधील असंतोषाची ही प्रथमच सुरवात झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

कोल्हेंच्या प्रवेशामागचे गमक काय? 
निवडणुका आल्या म्हणजे कार्यकर्त्यांची या पक्षातून त्या पक्षात ये-जा सुरूच असते; परंतु भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रवेशाबाबत मूळ भाजपचे कार्यकर्तेच साशंक झाल्याचे दिसून आले. जैन यांच्याच गटासमवेत असलेले महापौर व त्यांचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले विद्यमान तसेच खानदेश विकास आघाडीतील काही माजी नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे यामागचे नेमके "गमक' काय? 

खडसेंच्या समर्थकांचे स्थान डळमळीत 
भाजपतर्फे निवडणुका लढताना यापूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 15 नगरसेवक निवडून आले आहेत. काही जण अगदी थोडक्‍या मतांनी त्यावेळी पराभूत झाले होते. त्यांनीही तयारी केली आहे; परंतु आता बाहेरचे उमेदवार आल्यामुळे पक्षातील जुन्या नगरसेवकांसह इच्छुकांनाही निवडणुकीच्या रिंगणाबाहेर बसावे लागणार आहे. त्यामुळे आपोआपच खडसे यांच्या गटातील नगरसेवक तसेच कार्यकर्ते रिंगणातून बाहेर होतील. त्यामुळे शहरातील खडसे यांचे वर्चस्व कमी होईल. शिवाय, त्याचा फायदा आगामी लोकसभेत व विधानसभेत विरोधकांनाच अधिक होईल. भाजपला होण्याची शक्‍यताही या कार्यकर्त्यांना कमीच वाटत आहे. भाजपमधील वाढत्या प्रवेशामुळे त्याला केवळ "सूज' येणार आहे. त्याचा "ठणका' आज नाही तर कधीतरी जाणवणारच आहे. याच चिंतेने आता कार्यकर्त्यांना ग्रासले आहे. त्याची जाहीर वाच्यता आज महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे, एवढेच काय ते... 
 

Web Title: marathi news jalgaon election bjp rajkaran