पाचोर्‍यात आचारसंहिता लागू

सी.एन.चौधरी
गुरुवार, 8 मार्च 2018

जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पाचोरा - येथील नगरपरिषदेच्या प्रभाग 6 ब च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या 6 एप्रिल रोजी या एका जागेसाठी मतदान होणार आहे. पालिकेच्या या प्रभागातून  निवडून आलेले नगरसेवक अमोल शिंदे यांनी गेल्या महिन्यात नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या एका जागेसाठी शिवसेना राष्ट्रवादी भाजपा व काँग्रेस यांच्यात कमालीची ओढाताण होण्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. इच्छुक उमेदवार म्हणून पंडित शिंदे भुषण वाघ अनिलयेवले यांची नावे चर्चेत आली आहेत. अजून उमेदवार निश्चित नसले तरी या पोटनिवडणुकीच्या रंग चौफेर उधळला जाईल यात शंका नाही.
 
या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाल्याने शहरातील मुख्य रस्ते व चौकातील सर्व डिजीटल बॅनर काल ता ७ ला रात्री काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शहराने मोकळा श्वास घेतला आहे. रस्ते व चौक मोकळे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व रोज होणारे लहान-मोठे अपघात व हानी थांबली असून नागरिक कमालीचे आनंदले आहेत.
 
दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चूरस दिसत असून कोण कोणता उमेदवार देतो. यावर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित केले जाण्याचे चित्र आहे. या पोटनिवडणुकी मुळे शहरासह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात गरमागरमी वाढली असल्याचे चित्र आहे.

Web Title: marathi news jalgaon election code of conduct election banners