उमेदवारांचा "डिजिटल' फंडा; उभारले स्वतंत्र "वॉररूम' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

जळगाव ः हॅल्लो ताई, दादा मी... या उमेदवारांच्या कार्यालयातून बोलतोय. तुमच्या घरात इतकी मत आहेत, प्रभाग क्रमांक... मधून हे उमेदवार... या पक्षाकडून उभे आहेत, लक्ष असू द्या. असे आवाहन दूरध्वनी आणि एसएमएस मतदारांच्या मोबाईलवर येत आहेत. जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रभागात खास "वॉररूम' तयार केली असून, तेथे पाच ते सहा जणांची टीम अधिकाधिक मतदारांना दूरध्वनी करून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. 

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम केले जाते. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना विजयी करण्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचारापासून ते स्टार प्रचारक नेत्यांच्या सभांपर्यंत तसेच उमेदवारांना माहिती पुरविण्यापासून ते मतदारांना सहकार्य करण्यापर्यंतची माहिती देणारी वॉररूम करण्यात येत असते. प्रचारासाठी उमेदवारांकडून सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सीला किंवा याबद्दल माहिती असलेल्यांना काही दिवसांसाठी उमेदवारांनी काम दिले आहे. प्रचारासाठीच्या वॉररूममध्ये दूरध्वनी आणि एसएमएस पाठविण्यासाठी खास टीम तयार केली आहे. जवळपास सर्वच उमेदवारांनी अशी खास टीम तयार केली आहे. 
 
पक्ष पातळीवर अजून प्रतीक्षा 
निवडणुकीच्या रणांगणात उभ्या असलेल्या आपल्या उमेदवारांना विजयी करण्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, स्टार नेत्यांच्या सभांचे नियोजनासाठी वॉररूम तयार केले जाते. प्रामुख्याने भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांकडून वॉररूम तयार करण्याचे नियोजन आखले आहे. परंतु, अद्याप पक्ष कार्यालयात वॉररूम कार्यरत झालेल्या नसून, येत्या दोन- तीन दिवसात वॉररूम तयार तयार करून त्यासाठीची टिम निश्‍चिती करणे सुरू आहे. 
 
उमेदवारांकडून संपर्क 
पक्षाच्या पातळीवर वॉररूम तयार होणे बाकी असले तरी, उमेदवारांनी स्वतःची वॉररूमची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. काही उमेदवारांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे, तर प्रभागातील चार उमेदवारांनी एकत्रित आपली यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मतदारांना संदेश, व्हॉटस्‌ऍप मॅसेज पाठविले जात आहेत. याशिवाय स्वतः उमेदवार फोनवरून संपर्क साधून आम्हाला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करू लागले आहेत.

Web Title: marathi news jalgaon election digital wararoom