निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या 132 कर्मचाऱ्यांना "कारणे दाखवा' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जळगाव ः जळगाव शहर मतदारसंघातील बाराशे कर्मचाऱ्यांना आज निवडणुकीविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या 132 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव शहर मतदारसंघासाठी 1200 कर्मचाऱ्यांना आज छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला 132 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी हजर राहा; अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे 1068 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संभाजीराजे नाट्यगृहात सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालयाचे प्रशिक्षित ट्रेनर व सेक्‍टर अधिकारी यांचा समावेश होता. यात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत 600 कर्मचाऱ्यांना, तर दुसऱ्या सत्रात उर्वरित 600 जणांना दुपारी बारा ते दोन व तीन ते सायंकाळी पाच या वेळेत मशिन हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी तेरा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. 

निवडणूक खर्चाबाबत निरीक्षकांची बैठक 
आचारसंहिता व उमेदवारांच्या खर्चाबाबत नियंत्रणासाठी 6 स्थिर पथके, 6 फिरती पथके, 2 व्हीडीओग्राफी पथके नियुक्त केली आहेत. त्यांची महापालिकेत निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. उमेदवारांच्या सभा, बैठका, मिरवणुकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या तसेच या खर्चाचा काटेकोर व वस्तुनिष्ठ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विनापरवानगी कृती निदर्शनास आल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही संजीवकुमार यांनी दिले. बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली हिंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election duty 132 karmchari notice