निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी "ऍप' 

निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी "ऍप' 

जळगाव ः आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीझन व्हिजिलन्स अंतर्गत "सी-व्हिजिल' हे नवे मोबाईल ऍप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणुकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ऍपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे ऍप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र ठरणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता, खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय, जबाबदार भूमिका बजावू शकतात. 

तक्रारीसाठी हे करा... 
आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलित स्थान मॅपिंगसह ऍपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. 

नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी, भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढळले, तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रार कर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल. 


अशा तक्रारी अपेक्षित... 
* मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप 
* शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर 
* मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात 
* जमावाला चिथावणीखोर भाषण देणे 
* मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर 
* मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे 
* उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी माहिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com