जलसंपदामंत्री महाजनांचे सुरेशदादांपुढे लोटांगण : आमदार डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

जळगाव : महापालिकेत शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. त्या सत्तेच्या विरोधात भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार सुरेश भोळे यांनी आवाज उठविला. मात्र, त्याच नेत्यांना अंधारात ठेवून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्यासोबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महाजन यांनी जैन यांच्यासमोर अक्षरश: लोटांगण घातले आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लगावला आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, ऍड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. 
यावेळी आमदार डॉ. पाटील म्हणाले, की भाजपचे नेते व जलसपंदामंत्री गिरीश महाजन, आमदार चंदुलाल पटेल, शिवसेनेचे व खाविआचे नेते माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी महापालिकेत भाजप-शिवसेना-खाविआची युती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही युती म्हणजे भाजप-सेना किंवा खाविआ नव्हे तर जलसंपदा मंत्री महाजन आणि सुरेशदादा जैन यांची मैत्री आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला महापालिकेत विजयी करण्यासाठी भाजपचे नेते खडसे यांनी मोठे कष्ट घेतले होते. तर भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी जळगावच्या विकासासाठी विधानसभेत वेळोवेळी प्रश्‍न उपस्थित करून प्रयत्न केले होते. परंतु मुख्यमंत्र्याच्या युतीच्या चर्चेत या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना अंधारात ठेवून ही युती करण्याचा प्रयत्न म्हणजे मंत्री महाजन यांचे जैन यांच्यापुढे अक्षरश: लोटांगणच आहे. 

राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा : देवकर 
महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची असल्याचे मत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की खाविआ, भाजपलाही संधी देण्यात आली आहे. "राष्ट्रवादी' कॉंग्रेसला संधी दिल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. जनता यावेळी निश्‍चित संधी देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

शहराची अवस्था बिकट : गुजराथी 
विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी म्हणाले, की एक वेळ शहराचे काम पाहण्यासाठी इंदूरचे महापौर जळगावला येत होते. परंतु आज मात्र त्याच शहराचा चेहराच खराब झाला आहे. 

Web Title: marathi news jalgaon election girish mahajan jain