जळगावातील जैन गटाच्या महापौर कोल्हेसह सहा नगरसेवक भाजपात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव : माजी मंत्री शिवसेना व जळगाव महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापौर झालेले ललीत कोल्हे यांच्यासह सहा नगरसेवकांनी आज भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावातील भाजप-सेना-खाविआ युतीच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जागा वाटप झाल्यास युती होईल असे सूतोवाच केले आहे. 

जळगाव महापालिका निवडणूका जाहिर झाल्या आहेत. जळगावात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. गेल्या वर्षभरापूर्वी मनसेचे महापालिकेतील गटनेते ललीत कोल्हे यांनी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करीत मनसेच्या अकरा नगरसेवकांसह त्यांच्या खानदेश विकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना महापौरपदही देण्यात आले होते. सद्या ते खानदेश विकास आघाडीसोबतच होते. मात्र आज महापौर ललीत कोल्हे यांच्यासह सहा नगरसेवकांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, खुशबू बनसोडे, पदमाबाई सोनवणे, संतोष पाटील, या पाच नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. 
 
जैन यांचा गट सोडला-महाजन 
महपौर कोल्हे यांच्या प्रवेशबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, कि महापौर ललीत कोल्हेसह सहा नगरसेवक सुरेशदादा जैन गटासमवेत होते. त्यांनी आता त्यांचा गट सोडून भाजपत प्रवेश केला आहे.जळगाव महापालिकेत आता भाजपशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आमच्याकडे प्रवेशाचा ओढा वाढला आहे. काल राष्ट्रवादी, नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यामुळे आमच्या नगरसेवकांची संख्या आता चाळीस पेक्षा अधिक झाली आहे. 

Web Title: marathi news jalgaon election mayor kolhe bjp