मुस्लिमबहुल परिसरात बाजी कोण मारणार ?

मुस्लिमबहुल परिसरात बाजी कोण मारणार ?

प्रभाग क्रमांक 18 हा पूर्वाश्रमीच्या दोन-तीन वेगवेगळ्या प्रभागांमधील भाग तुटून बनलेला आहे. मुस्लिमबहुल व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रभागात मुस्लिम मतदार ठरवतील, तेच नगरसेवक निवडून येणार आहेत. परंतु, तरीदेखील अल्पसंख्य असलेल्या हिंदू मतांवरही एखाद्या उमेदवाराचे विजयाचे गणित बिघडून हिंदू उमेदवार विजयी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 
प्रभाग क्रमांक 18 मध्ये सहकारी औद्योगिक वसाहतीचा भाग, संतोषी मातानगर, मास्टर कॉलनी, रामेश्‍वर कॉलनीचा पश्‍चिम भाग, लक्ष्मीनगर, गणेशपुरी, गृहकुल सोसायटी असा परिसर समाविष्ट होतो. यापैकी रामेश्‍वर कॉलनी, मास्टर कॉलनीचा परिसर मुस्लिमबहुल भाग आहे. दाटवस्ती असलेला हा परिसर संवेदनशील मानला जातो. या प्रभागात सुमारे 15 ते 17 हजार मुस्लिम व उर्वरित चार-पाच हजार हिंदू मतदार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांवरच विविध पक्षाच्या उमेदवारांची मदार अवलंबून असेल. 

मुस्लिम उमेदवारांवर भर 
प्रभागातील चारही जागांवर मुस्लिम उमेदवारांचा भरणा अधिक आहे. समाजवादी पक्ष, एमआयएमनेही या प्रभागातून आपले उमेदवार उभे केले आहेत. "अ'मधून शिवसेनेचे वंजी पाटील, भाजपचे अनिल देशमुख यांच्यासह एमआयएमचे रियाज बागवान, समाजवादी पक्षाचे शेख शोएब व सुलतान खाटीक हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता असली तरी अल्प हिंदू समाजाचेही दोन हिंदू उमेदवारांमध्ये विभाजन होऊ शकते, त्यामुळे प्रचंड चुरस असेल. 
प्रभाग 18 "ब'साठी शिवसेनेच्या हेमलता नाईक या विद्यमान नगरसेविका रिंगणात असून त्यांना भाजपच्या मुस्लिम उमेदवार शबानाबी सलीम पटेल, राष्ट्रवादीच्या सलमा पटेल व सुन्नाबी देशमुख या एमआयएमच्या उमेदवार असतील. तीन मुस्लिम व एक हिंदू उमेदवार अशा समीकरणात नेमके काय होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. तर प्रभागातील "क' जागेसाठी तीन मुस्लिम व एक हिंदू उमेदवार आहे. यात भाजपकडून शकीलाबी पटेल, सेनेच्या बिल्कीसबी खान, राष्ट्रवादीच्या सुनंदा पाटील व एमआयएमच्या सईदा शेख उमेदवार, अशी तिरंगी लढत या जागेसाठी होणार आहे. 

बहुरंगी लढत रंगतदार 
प्रभाग 18 "ड'मध्ये बहुरंगी लढत होत आहे. यात मुस्लिम व हिंदू प्रत्येकी चार, असे एकूण 8 उमेदवार आहेत. शिवसेनेचे इब्राहिम पटेल, भाजपचे जितेंद्र चोथे, एमआयएमचे खालिद खाटीक, समाजवादी पक्षाचे रियाजोद्दीन शेख, तसेच अपक्ष उमेदवारांमध्‌ये राहुल लष्करे, याकूब मुलतानी, उज्वल पाटील, आतिफ शेख, भरत सोनवणे आदी उमेदवार आहेत. 
 
भाजप अन्‌ एमआयएम 
हा एकमेव प्रभाग असा आहे की, त्यात भाजप-शिवसेनेसह समाजवादी पक्ष व एमआयएम अशा चारही विरोधी वैचारिक पक्षांचे उमेदवार आहेत. एमआयएमने चारही जागांवर उमेदवार दिलेला हा एकमेव प्रभाग आहे. तर तीन जागांवर समाजवादी पक्षाचेही मुस्लिम उमेदवार आहेत. याच प्रभागात भाजपने तीन मुस्लिम महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या या मुस्लिम महिला उमेदवारांसह एमआयएमचे उमेदवार कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com