प्रशांत नाईक विरूध्द अशोक लाडवंजारी : लढतीत कुणाला मिळणार जनतेचा कौल? 

प्रशांत नाईक विरूध्द अशोक लाडवंजारी : लढतीत कुणाला मिळणार जनतेचा कौल? 

जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे. 
प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण गाव, मेहरूण गावठाण, तांबापुरा (उत्तर पूर्व भाग)असा हा परिसर आहेत. प्रभाग 'ड'मध्ये प्रशांत सुरेश नाईक (शिवसेना), अशोक सिताराम लाडवंजारी(भाजप), दिपक पुंडलीक बाविस्कर(कॉंग्रेस), शेख आसिफ अन्वर(राष्ट्रवादी), निलेश चंद्रकांत पाटील (अपक्ष)असे पाच उमेदवार मैदानात आहेत. मात्र प्रशांत नाईक व अशोक लाडवंजारी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्‍यता आहे. 
प्रशांत नाईक हे शिवसेनेतर्फे प्रथमच निवडणूक लढवित असले तरी त्यांच्या घरात त्यांच (कै.)सुरेश नाईक व सुभद्रा नाईक या याच प्रभागातून नगरसेवक होते. नाईक परिवार याच मतदार संघातून निवडून येत आहेत. त्यांच्या मातोश्री सुभद्रा नाईक या भाजपच्या नगरसेविका होत्या. मात्र गेल्या निवडणूकीत त्यांनी सुरेशदादा जैन यांच्या गटात प्रवेश केला व खानदेश विकास आघाडीतर्फे त्या नगरसेविका होत्या. यावेळी त्यांचे पुत्र प्रशांत नाईक हे प्रथमच मैदानात आहेत.प्रशांत हे यापुर्वी झालेल्या पालिका व महापालिका निवडणूकीत आईच्या प्रचाराचे सुत्र सांभाळत होते. परंतु यावेळी तेच रणांगणात असल्यामुळे त्यांची खरी कसोटी आहे. त्यांचा या प्रभागात संपर्क चांगला आहे.आई नगरसेविका असल्याने विकास कामाचे नियोजन करण्यासह जनतेच्या आरोग्य, रस्त्याच्या तक्रारी सोडविण्याचे कार्य तेच करीत होते. त्यामुळे त्यांना महापालिकेतील कामाचाही अनुभव आहे.सुरेशदादा जैन यांचे ते कट्टर समर्थक आहेत. 
अशोक सिताराम लाडवंजारी हे माजी नगरसेवक आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. पक्षाचे ते महानगराध्यक्षही होते. याच प्रभागातून ते अपक्ष निवडून आले होते. परंतु सभागृहात ते भाजपचेच सदस्य म्हणून गणले जात होते,नगरसेवक म्हणून या प्रभागात त्यांनी त्यावेळी कामे केली होती. गेल्या वेळी मात्र त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढवित आहेत.त्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे. तसेच पक्षाचेही त्यांनी संघटन केले आहे. तसेच खडसे यांचे कट्टर समर्थक असल्याचे त्याचा त्यांना फायदा होण्याची अपेक्षाही आहेत. 
दोन्ही उमेदवारांच्या विजयाच्या अपेक्षेने जोरदार प्रचारास लागले आहे. दोन्ही उमेदवार हे लाडवंजारी समाजाचेच आहेत. या प्रभागात या समाजाचे मोठे प्राबल्य आहे, त्यामुळे कुणाला कौल मिळणार याकडेच लक्ष आहे. जळगाव शहरातील या लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com