जळगाव महापालिका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जळगाव : कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत यावेळी परिवर्तन होत असल्याचे चित्र समोर येत असून, "सकाळ'ने केलेल्या "एक्‍झिट पोल'मध्ये भाजप 44 जागा मिळवून सत्ताधीश होतानाचे दिसत आहे. तर 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांचे विधानसभा मतदारसंघापाठोपाठ महापालिकेतील साम्राज्य खालसा होत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचा वारू अवघ्या 26 व 3 पुरस्कृत अशा 29 जागांपर्यंत रोखला जाण्याचे चित्र या "पोल'मधून समोर येत आहे. 

"सकाळ'च्या वतीने मतदानोत्तर "एक्‍झिट पोल' घेण्यात आला. त्यातून जळगावकरांनी भाजपला संधी देण्याच्या दृष्टीने स्पष्ट बहुमतापर्यंत पोचवून ठेवल्याचे दिसत आहे. या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भाजप- शिवसेनेत काट्याची लढत होत असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बोटावर मोजण्याइतक्‍या जागाही मिळणे कठीण होत असल्याचे समोर आले आहे. 

असा आहे एक्‍झिट पोल 
"सकाळ'च्या या एक्‍झिट पोलनुसार भाजपला 44 जागा मिळण्याची शक्‍यता असून, शिवसेनेला 26 व शिवसेना पुरस्कृत 3 अशा 29 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. जळगावकरांनी "राष्ट्रवादी'ला 2 जागांचा कौल दिला असून, देशात सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असलेल्या कॉंग्रेसला मात्र जळगावकरांनी एकही जागा दिल्याचे "एक्‍झिट पोल'मधून तरी दिसून येत नाही. 

दिग्गज जागा राखणार 
या "एक्‍झिट पोल'मध्ये काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्‍यता असल्याचेही समोर आले आहे. तर मावळते महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, सदाशिव ढेकळे, माजी उपमहापौर सुनील महाजन, भारती सोनवणे, आमदार पत्नी सीमा भोळे, लता सोनवणे आदी दिग्गज आपल्या जागा राखणार असल्याचे यातून समोर आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election sakal exit pole