पडद्यामागील सूत्रधार : मैदानीखेळासोबत "शागीर्दांना' राजकीय यशाचेही डाव

पडद्यामागील सूत्रधार : मैदानीखेळासोबत "शागीर्दांना' राजकीय यशाचेही डाव

जळगाव : मैदान हाच त्यांचा "श्‍वास'त्या माध्यमातून त्यांनी खेळाडू घडविले, काही क्रीडा शिक्षक झाले तर काहींनी त्यांच्याचकडून राजकीय धडे घेऊन महापालिका निवडणुकीत एकदा नव्हे तीनदा नगरसेवकपद भूषविले असून आताही ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. ते गुरू म्हणजे माजी नगरसेवक श्‍याम कोगटा होय. माजी नगरसेवक (कै.)सीताराम ऊर्फ बबन बाहेती यांचे शिष्य आहेत. त्यांचा वारसा ते सांभाळत आहेत. ........ क्रीडा रसिक मंडळाच्या माध्यमातून "कबड्डी'खेळात नावलौकिक करणारे श्‍याम कोगटा यांनी केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. क्रीडापटू (कै.)सीताराम ऊर्फ बबन बाहेती यांचे ते शिष्य आहेत. मैदानीखेळासोबत राजकीय धडेही गुरू (कै.)बाहेती यांच्यासोबत गिरविले आहेत. हाच क्रीडा रसिक मंडळाचा मैदानावर बळ दाखविणारा परिवार पुढे राजकारणात यशस्वी झाला. श्‍याम कोगटा यांनी महापालिकेचे नगरसेवकपदही भूषविले आहे. तर त्यांच्या पत्नी साधना कोगटाही नगरसेवक होत्या. महापालिका निवडणुकीच्या राजकीय यशाचे गमक त्यांना सापडले आहे, मात्र त्यांनी ते आपल्यापुरते मर्यादित न ठेवता आपल्या क्रिडाशिष्यांनाही त्यांनी त्याचे धडे दिले आहेत आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, माजी नगरसेवक मनोज चौधरी, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक राजू मोरे, माजी स्थायी समिती सभापती वर्षा खडके हे याच क्रीडा रसिक परिवारातील सदस्य आहेत. विशेष म्हणजे या सहकाऱ्यांना निवडणूक लढविण्यासाठी पक्ष किंवा आघाडीचे बंधन कधीही घातले गेले नाही, त्यांना ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायची आहे. ते त्यांना स्वातंत्र्य असते. परंतु त्यांना निवडणुकीच्या प्रचारासह सर्व मार्गदर्शन कोगटा यांचे असते. यावेळीही त्यांचे सहकारी नितीन बरडे, त्यांच्या पत्नी संगीता बरडे, वर्षा खडके, मनोज चौधरी शिवसेनेतर्फे मैदानात आहेत. तर नगरसेवक राजू मोरे हे मैदाना बाहेर असले तरी आता त्यांच्या कन्या प्रियंका मोरे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. तर किरण राजपूत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांना प्रचारासह सर्व मार्गदर्शन कोगटा यांचेच असते अगदी निवडणुकीच्या दिवशी मतदान काढण्याबाबतची माहितीही ते आपल्या सहकाऱ्यांना देतात. त्याच बळावर हे सहकारी यशस्वी होतात. याबाबत श्‍याम कोगटा म्हणतात, आपण गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहोत. (कै.)बबन बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे घेतले. त्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून कार्य केले, मात्र आपण महापालिकेचे कोणतेही पद भूषविले नाही. परंतु आपल्या सहकाऱ्यांना राजकीय मार्गदर्शन केले. त्यांनीही कष्ट करून निवडणुकीत यश मिळविले आहे. यावेळी जे सहकारी उभे आहेत त्यांना निवडणुकीत सर्व मार्गदर्शन कोगटा करीत आहेत. त्यामुळे हे सहकारी निश्‍चित यशस्वी होतील असा त्यांना विश्‍वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com