मतदान स्लीप, केंद्राची माहिती "बीएलओ' घरी जाऊन देणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव ः मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव कोणत्या प्रभागाच्या यादीत आहे, केंद्र कोणते हे शोधण्यासाठी धावपळ करावी लागते. ही बाब लक्षात घेता "बीएलओ'च्या माध्यमातून मतदारांना थेट घरपोच मिळणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. 

मनपा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि मतदान केंद्र शोधण्यास मतदारांना सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्‍त पुढे म्हणाले की, बीएलओच्या माध्यमातून प्रभागनिहाय मतदान केंद्र व अनुक्रमांकाची स्लीप मतदारांना घरपोच मतदानाच्या आठ दिवसआधी दिली जाणार आहे. 

एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी दोन टेबल 
एक ऑगस्टला मतदान झाल्यानंतर 3 ऑगस्टला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे मतमोजणीचा आराखडा तयार केला आहे. यात मतमोजणी ठिकाणाची व्यवस्था, मतमोजणीसाठी किती टेबल ठेवावे याबाबत नियोजन झाले आहे. मतमोजणीसाठी 19 प्रभागासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 8 टेबल तर प्रभागनिहाय दोन टेबल असणार आहेत. 

चार रंगात असेल मतपत्रिका 
प्रभागात अ, ब, क, ड नुसार उमेदवार आहेत. त्यानुसार मतदानासाठी पांढरा, निळा, गुलाबी, पिवळा अशा चार रंगाची मतपत्रिका तयार केली जाणार आहे. मतपत्रिका औरंगाबाद येथील मुद्रनालयातून छापण्यात येणार आहे. सैनिकांसह निवडणुकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटपाच्या दिवशीच टपाली मतपत्रिका दिली जाणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. 

मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर 
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे. याबाबत आज सायंकाळी औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली. यात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करू असे आश्‍वासन दिले. यात रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे फलक लावले जाईल. प्रशासनाच्या वतीने देखील 1 लाख जनजागृतीपर पत्रक वितरित केले जाणार आहेत. 

खर्च नियंत्रणासाठी अधिकारी 
मनपा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, निवडणूक खर्च नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील दोन अधिकारी तर तहसीलदार संवर्गातील सहा अधिकारी मिळावे. यासाठी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. 
 
कामगारांना मतदानासाठी एक तासाची सुट्टी 
औद्योगिक कंपनीतील कामगारांना मतदानासाठी एक तासाची सुट्टी मिळेल. तसेच मतदान करून याल तरच कंपनीत एन्ट्री अशी सूचना दिली जाणार असल्याचेही लघुउद्योग पदाधिकाऱ्यांनी बैठकीत आयुक्तांना सांगितले. 
 
Web Title: marathi news jalgaon election slip blo