निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

जळगाव : केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक ड्यूटीचा प्रशिक्षणासाठी आलेल्या रामदास माणिक जाधव (वय 55) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास बसस्थानकावर घडली. 

जळगाव : केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक ड्यूटीचा प्रशिक्षणासाठी आलेल्या रामदास माणिक जाधव (वय 55) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास बसस्थानकावर घडली. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर येथील रहिवासी रामदास माणिक जाधव हे जामनेर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरीस आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जाधव यांची केंद्राध्यक्ष म्हणून ड्यूटी लावण्यात आली आहे. आज सकाळी चोपडा येथे केंद्राध्यक्षांचे प्रशिक्षण होते. त्यासाठी ते गेले होते. दुपारी प्रशिक्षण आटोपून ते जळगाव बसस्थानकावर आले. याठिकाणी त्यांच्या छातीत अचानक दुखत असल्याने ते जमिनीवर कोसळले. याबाबतची माहिती बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिसात माहिती दिली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र मेंढे, प्रशांत जाधव यांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेत रामदास जाधव यांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता मृत घोषित केले. 

...तर वाचले असता त्यांचा जीव 
बसस्थानकावर बसची वाट बघत असताना रामदास जाधव यांना तीव्र झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. परंतु त्याठिकाणी असलेल्या प्रवाशांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. 

निवडणुकीनंतर होणार होती बदली 
रामदास जाधव हे सहा वर्षांपासून जामनेर येथे स्थायिक झाले होते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने ते आपल्या गावी जात होते. यावर्षी रामदास जाधव यांची बदली होणार होती परंतु निवडणूक लागल्याने त्यांची बदली निवडणुकीनंतर होणार होती. परंतु त्यापूर्वीच रामदास जाधव यांच्यावर काळाने घाला घातला.

Web Title: marathi news jalgaon election training teachrer heart attck