Loksabha 2019 : निवडणूक साहित्य नेणाऱ्या वाहनांवर "जीपीएस' यंत्रणा 

अमोल कासार
मंगळवार, 2 एप्रिल 2019

ळगाव: जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सुमारे हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मुक्ताईनगर याठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

ळगाव: जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सुमारे हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मुक्ताईनगर याठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये सुमारे 11 तालुक्‍यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हाभरातील सुमारे 25 हजार कर्मचाऱ्यांसह 368 झोनल ऑफिसरांची नियुक्ती केली जाणार आहे. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दोन दिवसांपूर्वीच पार पडले. तसेच दोन्ही मतदार संघाच्या अंतर्गत जिल्ह्यात 2 हजार 111 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत 3 हजार 532 पोलिस ठाणे असून मतदानाच्या दिवशी अजून 85 पोलिस ठाण्यांची ऑब्झेव्हरी वाढून पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिली. 

360 केंद्रांवर "वेब कास्टिंग' 
जिल्ह्यात दोन्ही मतदान केंद्रांमधील संवेदनशील असलेले 360 (10 टक्के) केंद्रावर निवडणुकीच्या दिवशी वेब कास्टिंग दाखविण्यात येणार आहे. त्याचे सर्व कंट्रोल हे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, त्याठिकाणाहून या केंद्रांवर नजर ठेवली जाणार आहे. 

मतदारांच्या दुसऱ्या यादीचे काम युद्धपातळीवर 
दोन्ही मतदारसंघातील मतदारांची पहिली यादी 31 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सुमारे 27 हजार नवीन मतदारांचा समावेश झाला होता. त्यानंतर देखील नवीन मतदारांना नावनोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नवीन मतदार यादी 8 एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करावयाची असल्याने ही यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या यादीत सुमारे 3 हजार नवीन मतदारांवरच समावेश होणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. 

मतदारांना मिळणार सोयीसुविधा 
मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्राबाहेर भर उन्हात ताळकटत बसावे लागत असल्याने मतदारांना पिण्याच्या पाण्यापासून ते पाळणाघर, तसेच मतदारांना बसण्याची व्यवस्था, अपंग मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यापर्यंतच्या सुमारे 15 वेगवेगळ्या सुविधा देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. 

मतमोजणी ठिकाणी राहणार स्ट्रॉंगरुम 
रावेर व जळगाव या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी जळगावात होणार आहे. मतमोजणी ठिकाणी मतदान यंत्राचे स्ट्रॉंगरुम तयार करण्यात येणार असून, त्याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी फ्लाइंग स्कॉडची देखील नेमणूक करण्यात येणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon election war GPS sistym