खाविआ-शिवसेनेसोबत युती नकोच! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी अक्षरश: "युती नकोच,' असे म्हणत दोघांना साकडे घातले. 
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना, खानदेश विकास आघाडीची युती होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सहमती दर्शविली आहे; परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

मंत्री महाजनांसमोर घोषणा 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन आज सायंकाळी भाजपच्या कार्यालयात आल्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर "युती नकोच' अशा घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्ते संतप्त होते. संघटना नव्हती तेव्हा आपण लढलो. आता तर राज्यात, केंद्रात सत्ता आहे. पक्षाची ताकद वाढलीय. तरीही आपण युती का करीत आहोत, असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 

महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, त्याचे कोणतेही उत्तर दिले नाही. यावेळी आमदार सुरेश भोळे हेही उपस्थित होते. यावेळी मंडल अध्यक्ष कपिल पाटील, राजू मराठे, धीरज सोनवणे, सुशील हासवानी, राहुल वाघ, राहुल पाटील आदी उपस्थित होते. 
 
खडसेंच्या निवासस्थानी घोषणा 
भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगावातील "मुक्ताई' निवासस्थानी काही कार्यतकर्ते व नगरसेवक उपस्थित होते. त्यांनीही तेथे युतीविषयी नाराजी व्यक्त केली. "नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या. आम्हाला कोणत्याही प्रकारे युती नकोच, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी आपण याबाबत वरिष्ठांशी बोलणार आहोत, असे आश्‍वासन श्री. खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी महापालिकेतील गटनेते सुनील माळी, नगरसेवक रवींद्र पाटील, नवनाथ दारकुंडे, राजू खेडकर, जितेंद्र बागरे, भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुभाष शौचे आदी उपस्थित होते. 
 
भ्रष्टाचाऱ्यांशी युती का? 
मंत्री महाजन भाजप कार्यालयात आल्याचे समजताच बी. जे. मार्केटमधील काही गाळेधारक, व्यापारी तसेच हॉकर्स तेथे पोचले. ज्यांच्या हाती आतापर्यंत सत्ता होती, त्यांनी या शहराला भकास केले. महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आपण लढलो, आता त्यांच्याशीच युती का, असा सवाल व्यापाऱ्यांनी महाजनांसमोर उपस्थित केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election yuti