विरोधकांच्या फुटीरांवर आघाडीची दहीहंडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होत आहे; तर खानदेश विकास आघाडीही मैदानात असणार नाही. दोन्हीकडच्या विद्यमान नगरसेवकांसह, इच्छुक असलेल्या अनेकांचा युतीच्या जागावाटपानंतर हिरमोड होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आतापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दरवाजे ठोठावणे सुरू केल्याचे दिसत आहे. भाजपचे काही मंडलाधिकारीच आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. परिणामी विरोधकांच्या मदतीने आघाडीची दहीहंडी फुटणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. 

महापालिका निवडणुकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आला. परंतु, पक्षीय पातळीवर मात्र फारशा हालचाली दिसून आल्या नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेली धावपळ आज थंडावलेली दिसून आली. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी संपर्क 
भाजप, सेना, खानदेश विकास आघाडी, माजी मनसे नगरसेवक अशी युती होण्याची शक्‍यता पाहता यातील अनेक नगरसेवकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागण्याची शक्‍यता आहे. शिवाय काही नवीन पदाधिकारी इच्छुक आहेत. मात्र या नवीन "युती'मुळे त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे अनेकांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडेही आपली जागा राखीव करण्यास सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
नागपूर अधिवेशन इफेक्‍ट 
नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा "इफेक्‍ट'ही जळगावच्या पक्षीय हालचालींवर दिसून आला. भाजप, सेनेचे आमदार व मंत्री विधिमंडळ अधिवेशनासाठी रवाना झाले आहेत; तर कॉंग्रेसचे पदाधिकारीही आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी नागपूरला गेले आहेत. त्यामुळे पक्षीय कार्यालयात आज फारशी वर्दळ दिसून आली नाही. 
 
खानदेश विकास आघाडी तसेच भाजपच्या काही मंडलाधिकाऱ्यांनी माझ्याशी उमेदवारीबाबत संपर्क केला आहे. पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांना तशी माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. 
- नीलेश पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: marathi news jalgaon election yuti aadhadi