औद्योगिक वीज दरवाढ रद्दसाठी सरकारने अनुदान द्यावे : औद्योगिक संघटनांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

जळगाव ः तत्कालीन सरकारने वीज दरवाढ रद्द आणि वीज दर स्थिर ठेवण्यासाठी महावितरणला दहा महिन्यांसाठी सहा कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. त्यानुसार आताच्या सरकारने देखील सप्टेंबर 18 ते मार्च 2020 या 19 महिन्यांसाठी 3 हजार 400 रुपयांचे अनुदान "महावितरण'ला देवून औद्योगिक वीज दर स्थिर ठेवावे. अशी मागणी औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे. 

वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती व महाराष्ट्र चेंबर प्रतिनिधींची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस राज्यातील वीस जिल्ह्यातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. यात चर्चा करताना सप्टेंबर 2013 मध्ये राज्यातील वीज ग्राहकांवर आयसी, जीसी व टीसी याप्रकारे एकूण दीड रुपया प्रति युनिट दरवाढ करण्यात आली होती. या विरोधात राज्यातील औद्योगिक संघटनांनी आंदोलन केले होते. बिलांची होळी व महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन सरकारने राणे समिती नेमत त्यांच्या शिफारशीनुसार वीज दर पूर्वीच्या पातळीवर स्थिर ठेवण्यासाठी जानेवारी ते ऑक्‍टोंबर 2014 पर्यंत दरमहा सहाशे रुपयांप्रमाणे अनुदान दिले होते. त्यानुसार आताच्या सरकारने देखील आजच्या औद्योगिक परिस्थितीत असाच निर्णय घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दरमहा दीडशे कोटी व एप्रिल 2019 पासून दरमहा दोनशे कोटी रुपये यानुसार एकूण 3 हजार 400 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. 

जानेवारीत राज्यभर आंदोलन 
संघटनांतर्फे करण्यात आलेल्या मागणीसाठी जानेवारी महिनाअखेरपर्यंत संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय रास्ता रोको व महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, औरंगाबाद, अकोला, नागपूर याठिकाणी मेळावे व सभा घेऊन जनजागरण करण्यात येणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon electricity rata anudan