अभियांत्रिकीतील विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव ः केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने असोदा शिवारातील शेतामधील झाडाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मुक्ताईनगर तालुक्‍यातील सुकळी येथील प्रदीप समाधान कोळी हा तरूण जळगाव शहरातील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरूवारी रात्रीच्या सुमारास असोदा शिवारातील तुषार काळे यांच्या गट क्रमांक 14/73 शेतातील झाडाला दोर बांधून गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या मजूरांना घडलेला प्रकार रेल्वे गेटमनला सांगितला. गेटमन यांनी पोलिसांशी घटनेची माहिती दिली. 

खिश्‍यात मोबाईल, आधारकार्ड अढळले 
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण वाडीले कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तरूणाचा मृतदेह खाली उतरविला. दरम्यान, घटनास्थळाची हद्द तालुका पोलीस ठाण्याची असल्याने ते देखील घटनास्थळी पोहचले होते. तरूणाच्या खिशात आढळलेल्या आधारकार्ड आणि मोबाईलवरून त्याची ओळख पटली.

Web Title: marathi news jalgaon engineering student suicide