विमान सेवेसाठी सोमवारी तिकीट विक्री सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

जळगाव ः जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा जळगावमध्ये सुरू करण्यासाठी ट्रूजेट विमान कंपनीतर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 जुलैपासून जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा होण्याचे संकेत आहे. मात्र डीजीसीए परवानगी न मिळाल्याने विमान सेवा सुरू करण्यास उशीर होईल. दरम्यान विमान कंपनी येत्या सोमवारपासून तिकीट विक्री सुरू करेल अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. 

पंधरा दिवसांपूर्वी हैदराबाद येथील "ट्रूबो मेगा एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड अर्थात ट्रूजेट कंपनीतर्फे 17 जुलैपासून विमानसेवा सुरू करीत असल्याची माहिती कंपनीचे सेल्स मॅनेजर निषीत भट्ट यांनी शहरातील अनेक उद्योजक, व्यापारी, डॉक्‍टर, प्रतिष्ठितांच्या बैठकीत दिली होती. 
अहमदाबाद, जळगाव, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. साधारणतः पहिल्या 36 प्रवाशांसाठी 1500 ते 2000 असे भाडे असेल. नंतरच्या प्रवाशांसाठी जादा भाडे असेल. कंपनीने विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. फक्त "डीजीसीए'ची परवानगी बाकी आहे. ती अद्याप मिळालेली नाही. ती उद्यापर्यंत मिळाल्यास सोमवारपासून तिकीट विक्री सुरू होईल. 

सव्वा तासात जळगाव ते अहमदाबाद.. 
सोमवारी अहमदाबादहून विमान सकाळी पावणेदहाला निघेल. जळगावला अकराला पोचेल. वीस मिनिटांचा ब्रेक घेऊन परत 11.20 ला विमान जळगावहून निघेल. 12.35 ला अहमदाबादला पोचेल. सव्वातासात विमान जळगावहून अहमदाबादला पोचेल. 

अशी असेल सेवा 
मंगळवार, बुधवार, गुरुवार ः तीन दिवस अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई, मुंबई ते जळगाव, जळगाव ते अहमदाबाद अशी विमान सेवा असेल. 
शुक्रवार, शनिवार, रविवार ः हे तीन दिवस अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई, मुंबई ते कोल्हापूर, कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते जळगाव, जळगाव ते अहमदाबाद अशी सेवा असेल. अहमदाबादहून सकाळी पावणेदहाला विमान निघेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eroplane ticket monday open