रावेर,मुक्ताईनगर परिसरा भूंकपाचे सौम्य धक्के

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तालुक्‍यात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जाणवणाऱ्या धक्‍क्‍यांमुळे परिसरातील नागरीकांनी घराबाहेर धाव घेतली होती. 
रावेर, मुक्‍ताईनगर परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार आवाज होवून अचानक जमिन हलू लागल्याचे जाणीव झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली होती. दोन सेंकदापर्यंत भुकंपाचे धक्के जाणवले. भुकंपाचा सौम्य धक्‍का असल्यामुळे परिसरात नुकसान किंवा जीवीत जानी झाली नाही. मात्र, काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचे परिसरातील नागरीकांकडून सांगण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon erth quick raver