मुख्यमंत्री फडणवीसांचे हेलिकॉप्टर महाजनांना घेण्यासाठी जळगावात 

live photo
live photo

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभा घेतली. त्या ठिकाणी जात असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने जळगावला आले, त्वरित बऱ्हाणपूरला रवानाही झाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मैत्री आता उघड झालेली आहे. महाजन बहुतांश कार्यक्रमात फडणवीसांसोबत असतात. सरकारविरुद्ध निघालेली आंदोलने, धरणे, मोर्चे यांच्यात समन्वय घडवून अडचणीच्या काळातही महाजन फडणवीस सरकारच्या मदतीला अनेक वेळा धावून गेले आहेत. त्यामुळे त्यांना "सरकारचे संकटमोचक' असे म्हटले जात आहे. 
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर गाव जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. त्या ठिकाणी भाजपच्या विधानसभेच्या उमेदवाराचा देवेंद्र फडणवीस प्रचार करण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर सभाही घेतली. मात्र बऱ्हाणपूरला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस जलसंपदामंत्री महाजन यांना घेण्यासाठी सकाळी साडेदहाला औरंगाबादमार्गे जळगाव विमानतळावर हेलिकॉप्टरने आले होते. सकाळी ते विमानाने औरंगाबाद येथे आले, त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने ते जळगाव विमानतळावर आले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या खालीही उतरले नाहीत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे हेलिकॉप्टरमध्ये बसले त्यांना घेऊन हेलिकॉप्टर तातडीने बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. यावेळी विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, भाजपचे गटनेते भगत बालाणी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com