निवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे  

निवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे  

फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. 

भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते. बुथप्रमुख यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार हरिभाऊ जावळे यांनी विजयाचे गणित कसे मांडता येईल याबाबत मार्गदर्शन केले. विजयासाठी बूथ प्रमुख, पेज प्रमुख यांनी मेहनत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. खासदार तथा रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे, मलकापूरचे आमदार चैनुभाऊ संचेती , भाजप प्रदेश संघटक मंत्री विजयराव पुराणिक यांनीही पेज प्रमुख, बूथ प्रमुख, वर असलेली जबाबदारी पार पाडावी व शासनाच्या योजना वैयक्तिक योजना मतदारांपर्यंत पोहचवाव्या याविषयी मार्गदर्शन केले. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा सुनील नेवे यांनी पेज प्रमुखांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, मनोज बियाणी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, राजेंद्र फडके, प्रा. सुनील नेवे, बी. के. चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, मोहन शर्मा, रामभाऊ झांबरे, जिल्हा परिषद सदस्य नंदा पाटील, रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता सपकाळे, सुरेश धनके, पल्लवी चौधरी, माधुरी नेमाडे, नगराध्यक्ष महानंदा होले, अनिता येवले, हर्षल पाटील, हिरालाल चौधरी, पद्माकर महाजन, मिलिंद वायकोळे, सुनील पाटील, डॉ. नरेंद्र कोल्हे, तालुका सरचिटणिस विलास चौधरी, वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, उज्जैनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. वासुदेव नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. विलास चौधरी यांनी आभार मानले. साडेसहा हजार पेजप्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com