तीन लाख चाळीस हजार मेट्रिक टन खते मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

जळगाव ः मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. जिल्ह्यात एक जूनला बियाणे उपलब्ध होणार असून कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. कापूस, रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन लाख 40 हजार मेट्रिक टन खते मिळणार आहेत. 

जिल्ह्यात खरिपासंबंधीचा पतपुरवठा संबंधित कंपन्यांनी सुरू केला आहे. मागील खते सुमारे 40 हजार टन शिल्लक असल्याने हा पुरवठा धीम्या गतीने सुरू आहे. सुमारे नऊ हजार मेट्रिक टन युरिया शिल्लक असल्याने युरियाचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यात युरियाचा 90 हजार मेट्रिक टनांपर्यंत पुरवठा होणार आहे. 

जिल्ह्यासाठी 25 लाख कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. जूनमध्ये कापूस बियाण्याची विक्री होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तृणधान्य, गळीत धान्याच्या पेरणीसंबंधी बियाण्याचा मुबलक पुरवठा होईल. त्यासाठी केंद्रीय बियाणे महामंडळ, महाबीज यांच्याकडून अधिकाधिक बियाण्याचा पुरवठा होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. 

बोंडअळी न येण्यासाठी कापूस बियाणे जूनमध्ये उपलब्ध करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. बियाणे व खते जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. खते शिल्लक आहेत. यामुळे खत व बियाणे टंचाई यंदा नाहीच. 
-मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon faltilijher farmer 3 lakh metrick tan