Video शेतकऱ्याची शक्कल : जुगाड करून मका पिकाची लागवड 

corn tractor farming
corn tractor farming

नांद्रा (ता. पाचोरा) : खरिपाची व रब्बीची एकत्र आलेली शेतीकामे अशातच मजुरांचा तुटवडा यामुळे राणीचे बांबरुड (ता. पाचोरा) येथील प्रयोगशील युवा शेतकऱ्याने त्यांच्या शेतावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन मजूर लावून जुगाड यंत्राचा वापर मक्याची यशस्वी लागवड केली. युवा शेतकऱ्याची ही शक्कल यशस्वी ठरली असून सध्या त्याच्या शेतातील मका लागवडीचा हा विषय चर्चेचा ठरला आहे. 

बांबरुड राणीचे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मयूर वाघ यांना आपल्या शेतात मक्याची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी मजुरांची शोधाशोध सुरू केल्यानंतर पुरेसे मजूर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने केवळ दोन मजूर लावून जुगाड यंत्राचा वापर करून रब्बी हंगामातील मक्याची लागवड केली. या जुगाड यंत्राच्या साहाय्याने झालेली ही लागवड पाहण्यासाठी परिसातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर भेट दिली. आजच्या काळात पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करणे कशी गरजेची झाली आहे, याचा प्रत्यय मयूर वाघ यांच्या प्रयोगातून शेतकऱ्यांना येत आहे. 

असे तयार केले जुगाड यंत्र 
शेतकरी मयूर वाघ यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे. त्याच्या जोडीला टिलर व फाळचा वापर करून त्यांनी हे जुगाड यंत्र तयार केले. या यंत्राच्या साहाय्याने चार एकरावरील क्षेत्रात केवळ दोन मजुरांच्या साहाय्याने मक्याची लागवड केली. ट्रॅक्टरच्यामागे टिलरचे दोन फाळ लावून त्याला पेरणी यंत्र जोडले. टिलरवर दोन मजुरांना बसवून त्यांनी पेरणीयंत्राच्या साहाय्याने मक्याची लागवड केली. एक एकर मक्यासाठी चार मजूर अपेक्षित असतात. त्यानुसार, चार एकरसाठी १६ मजूर लागतात. मात्र, एकाच दिवसाला एवढे मजूर मिळत नसल्यामुळे चार एकराच्या लागवडीचे काम चार दिवस तरी चालते. परंतु या जुगाड यंत्राने हीच लागवड दोन मजुरांनी एकाच दिवसात केली. 

मी आतापर्यंत मक्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मी तयार केलेल्या जुगाड यंत्राला पाहण्यासाठी बरेच शेतकरी येऊन गेले व येत आहेत. अशा यंत्रामुळे वेळ आणि पैशांची बचत होत असल्याचा प्रत्यय मला तरी येत आहे. 
- मयूर वाघ, शेतकरी, बांबरुड राणीचे (ता. पाचोरा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com