शेतकरी आत्महत्येचे 11 प्रस्ताव मंजूर 

शेतकरी आत्महत्येचे 11 प्रस्ताव मंजूर 

जळगाव ः शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी 11 प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. तीन प्रकरणे अपात्र करण्यात आली. 
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले समितीचे सदस्य उपस्थित होते. 2018-19 या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी समितीपुढे आली होती. 

शासकीय मदतीसाठी पात्र प्रस्ताव 
ज्ञानेश्वर भानुदास पाटील (धुपे, ता. चोपडा), लहू लक्ष्मण साबळे (आव्हाणे ता. जळगाव), पुंजु रूपचंद कोळी (अनवर्दे खु, ता. चोपडा), वसंत तुकाराम पाटील (सोनोटी, ता. बोदवड), कृष्णा वामन खैरनार (येवती, ता. बोदवड), किरण नामदेव गुंजाळ (रहिपुरी, ता. चाळीसगाव), श्‍यामकांत विनायक सूर्यवंशी (आमोदा बुद्रुक, ता. जळगाव), नीना पांडू सुरवाडे (वराड बुद्रुक, ता. बोदवड), भगवान बारकू पाटील (सावखेडे होळ, ता. पारोळा), प्रभू देवचंद भील (शिरसमणी, ता. पारोळा), समाधान युवराज पाटील (हनुमंतखेडे, ता. पारोळा) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com