फुपनगरी येथील शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : कर्जबाजारीपणा व नापिकी यास कंटाळून फुपनगरी (ता. जळगाव) येथे शेतकरी योगेश प्रेमराज चौधरी (वय 40) या तरूण शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज (ता.26) सकाळी ही घटना घडली. 

जळगाव : कर्जबाजारीपणा व नापिकी यास कंटाळून फुपनगरी (ता. जळगाव) येथे शेतकरी योगेश प्रेमराज चौधरी (वय 40) या तरूण शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज (ता.26) सकाळी ही घटना घडली. 
फुपनगरी येथे भरत जाधव यांच्या कापसाच्या शेतातील झाडाला गळफास बांधून त्यांनी आत्महत्या केली. चौधरी यांच्यावर सुमारे सहा लाख रुपये कर्ज होते. खासगी व सहकारी, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. केळी, कापूस व भाजीपाला याची शेती ते करायचे. परंतु मागील हंगामात दुष्काळ व यंदाचा ओला दुष्काळामुळे त्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले. कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते होते. कर्जासाठी सतत त्यांच्यामागे तगादा सुरू होता. अशा स्थितीत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer suside