गिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गिरणा नदीतून पिण्यासाठी आवर्तन सध्या सुरु आहे. परंतु गिरणा नदीवर सध्या अवैध्यरित्या शेतीसाठी पाणी मिळावे; म्हणून कोणतीही परवानगी न घेता तसेच विज अधिकृतपणे न घेता कुरंगी, माहेजी गिरणा नदीपात्रातुन पाणबुळ्या टाकून शेतीसाठी अनाधिकृतपणे पाणी उपसा सुरु आहे. 

गिरणा नदीतून होणाऱ्या अनधिकृत पाणी उपसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी देखील खाली गेली आहे. या परीसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गिरणा नदीतून प्रत्यक्षपणे अनधिकृतपणे पाणी उचलून शेतीसाठी व विटभट्यांसाठी वापरणाऱ्यांवर पाणीचोरी व विजचोरीच्या कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. 
सर्वाधिक पाणीचोरी जुन्या कुरंगीतुन होत आहे. खासगी विहिरी ह्या 70 ते80 फुटांखाली खोल आहेत, तर पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या फक्त 50 फुटांवर आहेत. वरसाडे गावातील गिरणावरील दहिगाव बंधाराखालील गिरणा नदीतील संपादीत क्षेत्रातील जागा ही विहिरी खोदण्यासाठी शेतकरी लाखोंच्या भावाने विक्री करतात आणि तेथुन उपसा करतात. कुरंगी, माहेजी, वरसाडे येथील नदीपात्रात कोणत्याही परवानगीशिवाय नदीपात्रात शेवड्या तयार करुण शेतीसाठी पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 

पाचोरा नगरपालिकाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पात्रातील तसेच गिरणा नदीवरील अनाधिकृतपणे शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. कुरंगी व माहेजी गिरणा नदीपात्रातुन अनाधिकृत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जप्त करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. 
- एस. बी. माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव. 

Web Title: marathi news jalgaon firna river water