फिटनेस फंडा - विष्णू भंगाळे यांचे दररोज प्राणायाम अन्‌ सकाळीच भोजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जळगावातील भंगाळे परिवाराने व्यवसाय तसेच राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. माजी महापौर विष्णू भंगाळे आपल्या कुटुंबाचा वारसा चालवत आहेत. एन.एस.यू.आय. संघटनेत काम करताना युवक कॉंग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर ते सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. महापालिका स्थायी समितीचे सभापतिपद तसेच जळगावचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. आताही ते शिवसेनेतर्फे निवडणूक मैदानात आहेत. राजकीय धावपळीतही ते शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीकडे लक्ष देताना दररोज सकाळी वॉकिग व प्राणायाम करतात. कोणताही नाश्‍ता न करता सकाळी नऊलाच ते भोजन करतात.

जळगावातील भंगाळे परिवाराने व्यवसाय तसेच राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. माजी महापौर विष्णू भंगाळे आपल्या कुटुंबाचा वारसा चालवत आहेत. एन.एस.यू.आय. संघटनेत काम करताना युवक कॉंग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर ते सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. महापालिका स्थायी समितीचे सभापतिपद तसेच जळगावचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. आताही ते शिवसेनेतर्फे निवडणूक मैदानात आहेत. राजकीय धावपळीतही ते शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीकडे लक्ष देताना दररोज सकाळी वॉकिग व प्राणायाम करतात. कोणताही नाश्‍ता न करता सकाळी नऊलाच ते भोजन करतात. त्यानंतर थेट रात्री आठलाच जेवण करतात. हाच नियम त्यांच्या दिवसभराच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. 
विष्णू भंगाळे जळगावात क्रीडा, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असतात. नगरसेवक म्हणून काम करताना आपल्या प्रभागातील जनतेला सुविधा देण्याकडे त्यांचे लक्ष असते. याशिवाय सिनेट सदस्य म्हणून ते विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवत असतात. क्रीडा क्षेत्रात त्यांचे कार्य असून, जम्परोप असोसिएशनचे महाराष्ट्राचे चेअरमन आहेत. ज्यूदो, फ्लोअर बॉल संघटनेचे सदस्य आहेत. त्यांची कामासाठीची धावपळ सकाळपासूनच सुरू होते. मात्र, यातूनही ते आपल्या तंदुरुस्तीकडे तितकेच लक्ष देतात. 

असा आहे दिनक्रम 
सकाळ सहाला उठून ते "वॉकिंगसह व्यायाम करतात. घरापासून गांधी उद्यानापर्यंत चालत जाऊन तेथे ट्रॅकवर वॉकिंग व रनिंग करतात. त्यानंतर तेथेच व्यायाम करतात. नंतर घरी आल्यावर प्राणायाम करतात. त्यानंतर तयारी करून ते सकाळी नाश्‍ताऐवजी नऊला थेट जेवण करतात. दुपारी ते हलका नाश्‍ता करतात. त्यानंतर रात्री आठला ते भोजन करतात. त्यांचा हा व्यायाम आणि भोजनाचा नियम बाहेरगावीही कायम असतो. विद्यापीठाच्या कामासाठी तसेच राजकीय कामासाठी ते बाहेरगावी गेल्यास त्या ठिकाणीही ते सकाळी नितनेमाने वॉकिंग करण्यास जातात. जेवण त्यांचे शाकाहारी व मांसाहारी दोघेही आहे. सकाळच्या जेवणात ते शाकाहारच घेतात. मात्र, रात्रीच्या जेवणात मांसाहार घेतात. साधारणपणे आठवड्यातून दोन वेळा ते मासे खातात. शरीराला आयर्न मिळण्यासाठी मासे चांगले असतात, असे त्यांचे मत आहे. महापालिका निवडणुकीत ते उमेदवार आहेत; तरीही त्यांचा व्यायामातील नियमितपणा सुरूच आहे. 

व्यवसायासह राजकीय जीवनात प्रत्येकाला धावपळ करावीच लागते. त्यासाठी तंदुरुस्ती आवश्‍यक आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी सकाळी व्यायामासोबत वेळेवर जेवण आवश्‍यक असते. त्यामुळे आपण सकाळीच नऊला जेवण करतो. ही वेळ कधीच चुकवत नाही. त्यामुळे रोजच्या कामात आपणास ऊर्जा मिळते. 
- विष्णू भंगाळे, माजी महापौर, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon fitness vishnu bhangale