मुंबई टू झारखंड टॅक्‍सीने सुरू होता प्रवास... परंतू जळगावात पकडले गेले. 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

मुंबई येथून चार टॅक्‍सीव्दारे झारखंडकडे जाणाऱ्या 15 जणांना आज जळगाव पोलीसांनी प्रभात कॉलनी चौकातील महामार्गावरून ताब्यात घेतले. 

जळगाव : "कोरोना' विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार लागू आहे. ज्या ठिकाणी आहे, तेथेच नागरीकांनी थांबावे असे पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी आवाहन केले आहे. त्यासाठी देशात सर्व भागात लॉकडाऊन असून प्रवासी वाहनेही बंद आहेत, अशा स्थितीत गावाकडे जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. मुंबई येथून चार टॅक्‍सीव्दारे झारखंडकडे जाणाऱ्या 15 जणांना आज जळगाव पोलीसांनी प्रभात कॉलनी चौकातील महामार्गावरून ताब्यात घेतले. 

देशभरात "लॉकडाऊन' केले असल्याने सर्वत्र पोलीसांची गस्त व बंदोबस्त आहे. त्यानुसार जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिसांची महामार्गावरही गस्त सुरू आहे. जिल्हा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आज महामार्गावर गस्त घालीत असतांना त्यांना एकामागून एक चार टॅक्‍सी काही माणसे भरून जातांना दिसल्या. या चारही टॅक्‍सी त्वरीत त्यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता. ते मुंबईकडून झारखंड येथे आपल्या गावी निघाल्याची माहिती मिळाली. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चारही टॅक्‍सी चालकांना ताब्यात घेत त्यांना तपासणीसाठी जळगाव जिल्हा वैदयकिय महाविद्यालयात पोलीस तपासणीसाठी रवाना केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Four people were arrested in Jalgaon, including four taxis going directly from Mumbai to Jharkhand