जिल्ह्यातील 4 रेशन दूकानांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

जिल्ह्यातील रेशन दुकानांत धान्य वाटपात गैरप्रकार, कमी धान्य वाटप यासह विविध तक्रारी आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशानूसार नेमलेली पथके छापे टाकून कारवाई करीत आहे.
सुनिल सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

जळगाव : रेशन दुकानात लाभार्थ्यांना कमी धान्य वाटप करणे, धान्याचे वाटप व साठा यात तफावत असणे, धान्य घेतल्याची पावती न देणे आदी कारणांमुळे जिल्ह्यात सर्वच रेशन धान्य दुकानांवर अचानक छापे टाकण्याची मोहिम जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अादेशान्वये सुरू झाली आहे. आतापर्यंंत 4 रेशन धान्य दुकानांवर पुरवठा विभागासह इतर नेमलेल्या पथकाने छापे टाकून चार रेशन दुकानांचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे. यामुळे रेशन दुकानादारामध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हयातील रेशन दुकानांमध्ये रेशन दुकानदारांन ‘थम’स्वतः करण्याची सवलत दिल्याने रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या वाट्याचे धान्य कमी देवून, उरलेल्या धान्याचा काळा बाजार करीत असल्याची बातमी सकाळ’ने 8 एप्रिलला प्रसिध्द केली हाेती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी प्रत्येक तालुक्यात दोन भरारी पथके नेमून रेशन दुकानात कमी धान्य वाटप हात असेल, काळाबाजार होत असेल तर थेट कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानूसार रेशन टाकून कारवाई करण्यात येत आहे.
सध्या कोरोनो‘संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊन असल्याने केंद्र व राज्य शासनाने रेशन दुकानांवर पुरेसे धान्य उपलब्ध करून दिले आहे. 5 किलो तांदूळ मोफत मिळत आहे. सोबत नियमीत धान्यही वाटप करण्याच्या सूचना आहे.
मात्र रेशनचे धान्य वाटप करताना लाभार्थ्यांचे ‘थम’घेवू नये अशा सूचना आहे. रेशन दूकानदारांनी स्वतःच थम ई-पॉस मशिनवर देवून धान्य वाटप करावे अशा सूचना आहे. हीच बाब संधी समजून रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या वाट्यावर असलेले धान्य देत नाही. एका कार्डावर पाच सदस्य असतील तर दोन किंवा तीन तीन सदस्यांच्या हिश्‍याचेच धान्य देतात. इतर सदस्यांचे धान्य वरूनच आले नाही, त्याला काय करणार ? हवे असेल तर घ्या. असे प्रकार सर्रास सूरू आहे. सदस्यांच्या हिश्‍यांचे उरलेले धान्य काळाबाजारात विकले नेत असल्याचे प्रकार राजरोसपणे घडतात.
कारवाई करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार आदी अधिकारी आहेत मात्र ते शासनाला रोजचा अहवाल देण्यात व्यस्त आहे. मग कारवाईला कोण येते हीच बाब हेरीत रेशन दुकानांमध्ये अंदाधूंदी सूरू आहे. ही बातमी ‘सकाळ’ने देताच जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची पथके नेमून रेशन दूकानांची अचानक तपासणी करण्यास सांगितले आहे.

या दुकानदारांचे प्राधिकारपत्र रद्द झाले आहे..
* संजय शालीग्राम घुले (चिंचोली, ता.जळगाव)
* एस.बी. लाेखंडे (कडू प्लॉट जूना सातारा, भुसावळ)
* गुलाब हिलाल फुलझाडे (बांभोरी प्र.चा.,ता.धरणगाव)
* भुषण सुधाकर सूरवाडकर (साळीबाग, ता.रावेर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon four reshan shop raid district