बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेची केली बदनामी 

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेची केली बदनामी 

जळगाव ः मोहराळे (ता. यावल) येथील विवाहिता व तिच्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून तिची बदनामी केल्याचा प्रकार घडला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन संशयित भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
यावल तालुक्‍यातील गृहिणीच्या नावाने गावातीलच भामट्याने 17 मार्चला फेसबुक अकाऊंट उघडले. एवढ्यावरच न थांबता त्याने संबंधित महिलेचा फोटोही वापरला. पीडितेच्या मुलीच्याही नावाने तसेच बनावट खाते उघडले. या फेसबुक खात्यांचा अक्षेपार्ह मजकूर टाकून सामान्य गृहिणीची बदनामी केल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात कलम-500 , माहिती तंत्रज्ञान अधिनियम-66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करताना फेसबुक खाते उघडण्यासाठी नमूद मोबाईल संपर्काचा पत्ता लावला. इंटरनेटवर वापर होतअसलेल्या आयपी ऍड्रेसवरुन संशयिताचा शोध लावण्यात येऊन गावातीलच ललित संजय महाजन याला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक अरुण निकम यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com