बोगस लाभार्थ्यांचे नावे कर्ज मंजूर करून अपहार 

बोगस लाभार्थ्यांचे नावे कर्ज मंजूर करून अपहार 

जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून बोगस लाभार्थ्यांच्या नावे 2 लाख 40 हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मंजूर कर्ज रीतसर वैयक्‍तीक बॅंक खात्यात वर्ग करणे अपेक्षित असताना महामंडळ आणि स्टेट बॅंकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंत्राटी कामगाराच्या नावाने ही रक्कम वर्ग केली. 2 लाख 40 हजार वर्ग होणे अपेक्षित असताना तब्बल 5 लाख 40 हजारांची रक्कम बेकायदेशीर विड्रॉल करून शासनासह बॅंकेची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

स्टेट बॅंक मुख्य शाखेचे महाप्रबंधक अशोक विनायकराव सोनूने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेत महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत गरीब गरजूंना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. महामंडळाने पाठवलेल्या लाभार्थींच्या प्रकरणांवर कर्ज मंजूर झाल्यास संबधीताच्या वैयक्तीक स्टेट बॅंकेतील खात्यात कर्जाची रक्‍कम वर्ग होऊन कर्जाचे खाते सुरू केले जाते व त्यातूनच फेड करायची असते. असे असताना महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्टेट बॅंकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस लाभार्थ्यांचे नावाने कर्ज मंजूर प्रकरणाची रक्कम संबंधितांच्या वैयक्तीक स्टेट बॅंक खात्यात वर्ग न करता बॅंकेतील कंत्राटी कामगाराच्या खात्यावर वर्ग केली. त्यापेक्षाही गंभीरबाब म्हणजे तीन लाभार्थ्यांना 3 लाख 40 हजार रुपये मंजूर झाले असताना संशयितांनी चक्क 5 लाख 40 हजारांची रक्‍कम कंत्राटी कामगाराच्या खात्यात टाकून तेथून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विड्रॉल करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. 

कर्ज मंजुरी कुणाला अन्‌ खातेदार वेगळेच 
अरुण बागरे (90 हजार), समाधान एकनाथ तिल्लोरे (50 हजार), परमवीर सुनील आठवले(1 लाख) असे तिघांना एकूण 2 लाख 40 रुपयांची रक्कम लाभार्थी म्हणून महामंडळाच्या सेंट्रल बॅंक शिवाजी नगर शाखेच्या खात्यातून स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत जावरे यांनी क्‍लिअरिंग करणे अपेक्षित असताना बॅंक सहाय्यक जयेश रघुनाथ सोनार यांनी कंत्राटी कामगार प्रकाश कुळकर्णी याच्या मदतीने सर्व चेक सेंट्रल बॅंक खात्यात जमा झाल्यावर जयेश सोनार याने स्वतःचे युजर आयडी वापरून अमरिश मोकाशी यांचे खात्यावर 50 हजार रुपये, संजीव सोनवणे यांचे खात्यावर 50 हजार, 70 हजार असे पाच वेळेस करून 4 लाख, सागर पत्की यांचे खातेवर एकदा 20 नंतर 70 असे 90 हजार असे एकूण 5 लाख 40 हजार रुपये खात्यात टाकले. 

3 लाख ज्यादा काढले 
सेंट्रल बॅंकेने स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेला 7 एप्रिलला पत्र व्यवहार करून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ(MPBCDC)च्या खात्यातून 3 लाख अतिरिक्त (ओव्हर ड्रॉन) काढण्यात आले. या प्रकरणी निनावी पत्रान्वये स्टेट बॅंकेच्या औरंगाबाद शाखा व्यवस्थापक तळेकर यांनी चौकशी केली असता अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने महामंडळातील संबंधित अधिकारी, कर्ज मंजूर झालेले बोगस लाभार्थी आणि स्टेट बॅंकेचे सहायक जयेश रघुनाथ सोनार, प्रकाश कुळकर्णी अमरिश मोकाशी, सागर पत्की अशा एकूण नऊ संशयितांच्या विरुद्ध अपहार केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com