गाळेधारकांची थकबाकी भरण्यासाठी धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जळगाव ः महापालिका मालकीच्या सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटमधील 913 गाळेधारकांना काही दिवसांपूर्वी 81 "क' ची नोटीस बजावली होती. त्यात पैसे भरण्यासाठी महापालिकेने पंधरा दिवसांची मुदत दिली होती. या नोटिशीची मुदत आता संपणार असल्याने गाळे कारवाईपूर्वी फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील सुमारे 35 गाळेधारकांनी बुधवारी (11 सप्टेंबर) पालकमंत्री गिरीश महाजनांसमोर महापालिका आयुक्तांकडे अडीच कोटी रुपयांचे धनादेश दिले. तसेच गाळेधारकांना थकबाकी रक्कम भरण्यासाठी कर्ज देण्यासही अनेक बॅंका सरसावल्याची माहिती आता समोर येत आहे. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांमधील 2 हजार 387 गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली. त्यामुळे गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यात जिल्हा न्यायालयात काही गाळेधारक गेले असता न्यायाधीशांनी 81 "क'नुसार कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला आदेश दिल्यानंतर कारवाईला सुरवात करण्यात आली. त्यानुसार सेंट्रल फुले मार्केटमधील 913 गाळेधारकांना 81 "क'ची नुकसान भरपाईची नोटीस बजावली. त्यांची पंधरा दिवसांची मुदत आता संपण्यात होती. तत्पूर्वी बुधवारी (11 सप्टेंबर) सुमारे 31 गाळेधारकांनी महापालिकेकडे पैसे भरून ही नोटीस मान्य केली. 

पैसे न भरणाऱ्यांवर कारवाई 
नोटीस मिळाल्यानंतर दिलेल्या मुदतीत गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला असून, कारवाईची तयारीही सुरू झाली आहे. मंगळवार (17 सप्टेंबर)नंतर थकबाकी रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

कर्ज देण्यास बॅंका सरसावल्या 
कारवाईच्या भीतीने गाळेधारक थकबाकीची रक्कम भरण्याची काहींनी सुरवात केली आहे; तर काही गाळेधारक थकबाकीची रक्कम भरण्यासाठी बॅंकांकडून कर्ज घेण्याची धावपळ सुरू आहे. काही बॅंका गाळेधारकांना कर्ज देण्यास तयार असल्याने कर्ज घेण्यासाठी व उर्वरित रक्कम गोळा करण्याची गाळेधारकांची फिरफिर सुरू आहे. तसेच काही गाळेधारक महापालिकेत येऊन थकबाकीची रक्कम किती असल्याची चौकशी करत आहेत. 

गाळेधारकांची बैठक घेऊन थकबाकीची रक्कम भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांची परिस्थिती नाही अशांसाठी बॅंकेनेही कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गाळेधारकांनी आपापली थकबाकी तत्काळ भरून जळगाव शहराच्या हितासाठी सहकार्य करावे. 
- रमेश मतानी अध्यक्ष, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघ, जळगाव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fule market bhde pending