गाळमुक्त धरण- गाळमुक्त शिवार अभियानास सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नांद्रा (ता.पाचोरा) ः पाचोरा तालुक्‍यातील "गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार' या अभियानातंर्गत लोकसहभागातून बहुळा मध्यम प्रकल्पामधील गाळ काढण्याच्या कामाला आजपासून सुरवात झाली. या अभियानाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अभियानातंर्गत गाळ काढण्याचे काम सुरू असून आतापर्यंत हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. 

पाचोरा तालुक्‍यात सुरू असलेल्या अभियानातंर्गत गाळ काढण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतू, सदर अभियानाचे उद्‌घाटन आज झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी धरणातील गाळ घेऊन जात आपल्या शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी आव्हान केले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पाचोरा तहसीलदार बि. ए. कापसे यांनी गाळाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पाचोरा प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी शेतकऱ्यांना गाळ टाकुन आपल्या जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते व शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. हा गाळ उपसा लोकसहभागातून करायचा आहे याला कुठलीही पावती लागणार नाही व शेतकऱ्यांनी जास्तीत ज्यास्त गाळ उपसासाठी सहभागी होण्याचे आवाहनन प्रांताधिकारी कचरे यांनी केले. यावेळी पाचोरा तालुक्‍यातील शेतकरी व महसुल विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर होते. 
 
Web Title: marathi news jalgaon gadmukt abhiyan