live photo
live photo

"गाळमुक्त धरण' योजनेंतर्गत जळगाव जिल्हा घेतला दत्तक 

जळगाव : दुष्काळी भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी सुरक्षा निश्‍चित करण्याच्या उद्दिष्टाने मेरिको लिमिटेडद्वारे महाराष्ट्र शासनाच्या "गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार' योजनेंतर्गत जळगाव जिल्हा दत्तक घेण्यात आला. या एकीकृत पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून 664 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातील 150 गावांना याचा लाभ मिळेल. 
फेब्रुवारी 2019मध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत म्हणून मॅरिकोने महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार केला आहे. जळगाव जिल्हा दत्तक घेतल्यानंतर मेरिको ने दुष्काळ निवारण कार्यात सोयीची कामे केली. ज्यामध्ये धरणांची डिसिल्टिंग करणे व एकीकृत पाणलोट उपचार यांचा समावेश आहे. 

150 गावांना होणार लाभ 
या जलाशयांच्या उपक्रमातून ही कंपनी जिल्ह्यातील 170 धरणांमध्ये डिसिल्टिंगद्वारे पाण्याची क्षमता निर्माण करून 150हून अधिक गावांचा आधार बनणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत पाण्याची मागणी भागविण्यास आणि उत्खनन केलेल्या मातीचा वापर करून जमीन सुपीकता सुधारण्यात मदत करण्या व्यतिरिक्त, घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा तसेच क्षेत्रात उपजीविका सुधारण्यासाठी देखील मदत मिळेल. 
"जलाशय' या उपक्रमातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत कंपनीने नुकतेच पाचोरा तहसीलमध्ये जलपूजन आयोजित केले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष उदयराज प्रभू,आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com