"सकाळ यिनर्स'ने केले निर्माल्य संकलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

जळगाव : "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने "यिनर्स'ने गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य संकलन केले. यावेळी "यिनर्स'ने सकाळी नऊपासून मेहरुण तलावावर निर्माल्य संकलन करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले. 

"सकाळ माध्यम समूहा'च्या यिन व्यासपीठांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने गणेशोत्सवात निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. यात शहरातील मेहरुण येथील गणेश घाटावर लहान मंडळ व घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. यावेळी "यिनर्स'ने चौकातच भाविकांकडून निर्माल्य जमा करत ते महापालिकेच्या वाहनात जमा केले. यामुळे परिसरात स्वच्छता दिसून आली. 
 
वाहतूक सुरळीत 
विसर्जनादरम्यान शिरसोली रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याप्रसंगी "यिन'च्या सदस्यांनी नागरिकांना वाहन लावण्याबाबत मार्गदर्शन करत वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. सोबतच याठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना पाण्यापासून दूर करत पालकांच्या स्वाधीन केले. 

Web Title: marathi news jalgaon ganesh visrjan yin members nirmalya