गणेशोत्सवात अभिनेते भरत जाधव, सुबोध भावे ठरणार आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले. 

जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले. 
महापालिका प्रशासनातर्फे आज महापालिकेच्या सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व गणेश मंडळ, सर्व सामाजिक संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, "महावितरण'चे कार्याकारी अभियंता संजय तडवी, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, सुभाष मराठे उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मिरवणुकीच्या मार्गावर होत असते. मिरवणुकीत अडथळा येऊ नये, यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध समस्या सांगितल्या. 

मोकळ्या जागेत मूर्त्यांची विक्री 
शहरातील टॉवर चौकापासून ते घाणेकर चौकापर्यंत मार्गावर गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने असतात. त्यामुळे 
वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या विक्रेत्यांना महापालिकेच्या सानेगुरुजी रुग्णालयाच्या मोकळ्या दुकाने लावण्याची परवानगी द्या, असे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पाडळे यांनी केली. याबाबत आयुक्तांनी टॉवर चौकासह आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली येथील विक्रेत्यांनाही मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले. 

मिरवणूक मार्गावर लाइट व्यवस्था वाढवा 
गेल्यावर्षी विसर्जन मार्गावर महापालिकेकडून केलेली प्रकाश योजना कमी होती. त्यामुळे मार्गावर जास्त 
लाइट बसविण्याची मागणी रामानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहम यांनी केली. तर तसेच मार्गावरील लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपी दुरुस्त करण्याची मागणी केली. महाविरणचे अभियंता कापुरे यांनी मंडळांनी हॅलोजनचा वापर न करता एलईडी लाईचा वापर करावा, असे आवाहन केले. 

पट्टीचे पोहणारे, दोन स्वयंचलित बोट 
गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी व निर्माल्य संकलनासाठी जिल्हा प्रशासन, महापालिकेच्या दोन स्वयंचलित बोटींसह पट्टीचे पोहणारे, कर्मचारी मेहरुण तलावावर राहणार आहे. तसेच पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यामातून लक्ष ठेवावे, असे मागणी मंडळातर्फे करण्यात आली. याचीही दखल घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी 
महापालिकेच्या मानाच्या गणपती मंडळार्फे 17 ते 21 सप्टेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात आर्केस्ट्रा, विनोदी नाटक, पारंपरिक वेशभूषा, कीर्तन व भजनासह गीतांचा कार्यक्रम असतील. तसेच गणेशोत्सवाच्या काळात अभिनेता सुबोध भावे, भरत जाधव यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीत मुंबई किंवा पुणे येथील पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या शंभर जणांच्या पथकाला बोलविण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ganeshostav bharat jadhav