गांजाच्या अतिसेवनामुळे येते नैराश्‍य 

गांजाच्या अतिसेवनामुळे येते नैराश्‍य 

जळगाव : आताच्या तरुणाईला व्यसनांनी जखडून टाकलेले आहे. अल्पवयीनांसह युवकांकडून सर्वाधिक व्यसन गांजा ओढण्याचे लागले असल्याने गांजामुळे अत्यंत कमी वयातच मुलांना नैराश्‍य येत असून नैराश्‍याच्या भरात त्यांच्याकडून अप्रिय घटना घडत असल्याची माहिती शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. 
व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कित्येक कुटुंब रस्त्यावर आलेली असून, अनेक कुटुंबांची राखरांगोळी झालेली आहे. अधिक व्यसनांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यातच शहरात अगदी सजहपणे व कोत्याही ठिकाणी मिळणारा गांजाचे अनेक अल्पवयीनांसह तरुण त्याच्या आहारी गेलेले आहे. मुलांना जडलेले व्यसन पूर्ण करण्यासाठी त्यांची पाऊले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे देखील वळू लागलेली आहे. गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांमध्ये नैराश्‍य येत असून नैराश्‍याच्या भरात त्यांच्याकडून अनेक अपरिचित प्रकार देखील घडले जातात. या मुलांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्यांना समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असल्याने हा एकमेव पर्याय व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी उरलेला आहे. 

नशेमुळे नैराश्‍याचे प्रकार 
गांजा ओढण्याचे व्यसन जडलेले अनेक अल्पवयीन तरुणांसह युवक हे मानसिक दृष्ट्या कमकुवत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांना आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याचे कोणत्याच प्रकारचे भान नसून ते स्वत:मध्ये गुरफटून गेले असतात. तसेच नशा केल्यानंतर समोरच्या सोबत अडखळून बोलणे, विसरून जाणे, भूक न लागणे असे त्याची लक्षणे असून ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होऊन जातात. 

समुपदेशनाची गरज 
सध्याच्या तरुण पिढी व्यसनाच्या आधीन गेलेली आहे. या तरुणांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्यावर औषधोपचारासोबतच त्यांना कुटुंबीय व मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनाची आवश्‍यक आहे. या युवकांना व्यसनामुळे आलेले नैराश्‍यामुळे त्यांना यातून बाहेर काढणे एक प्रकारे आव्हानच असल्याचे प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

अंमली पदार्थांवर निर्बंध आवश्‍यक 
शहरात अगदी सहजपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याने अनेक अल्पवयीन विद्यार्थी दशेपासूनच नशा करण्याची त्यांना सवय जडते. शहरात सर्रासपणे विक्री होणाऱ्या अमली पदार्थांच्या विक्रीवर शासनाने कडक निर्बंध लादण्याची आवश्‍यकता आहे. 
 
ही आहेत गांजा ओढण्याची लक्षणे 
गांजा ओढल्यामुळे भूक न लागणे, मेंदूची चालना कमी होणे, नैराश्‍यामध्ये जाणे, समोरच्या सोबत अडखळून बोलणे, नेहमी विसरून जाणे ही लक्षणे गांजा ओढण्यामुळे होऊ शकतात. तसेच मुलांना जडलेल्या व्यसन जडल्यास त्याच्यावर वेळीच उपचार होणे महत्त्वाचे असून त्याला मानसिक रित्या समुपदेशन होणे देखील गरजेचे आहे. 
 
गांजा ओढल्यामुळे मानसिक संतुलन बिघडून नैराश्‍य येते. यासाठी औषधोपचारासोबतच त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करणे महत्त्वाचे असते. 
- डॉ. गोविंद मंत्री कर्करोगतज्ज्ञ 
 
व्यसनापासून प्रवृत्त करण्यासाठी शालेय जीवनापासून त्यांच्या मनावर प्रतिबिंब करणे महत्त्वाचे आहे. पालकांनी पाल्याला असलेल्या व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. मयूर मुठे  मानसोपचारतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com