गटसचिवांच्या संपामुळे कामकाज ठप्प 

गटसचिवांच्या संपामुळे कामकाज ठप्प 

जळगाव ः जिल्ह्यातील गटसचिवांचे पगार दहा महिन्यापासून बंद आहेत. यामुळे गटसचिवांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी कर्जमाफीची शासनाने मागितलेली माहिती, कर्ज वितरणासाठी लागणारी माहिती गटसचिवांनी देणेही बंद केल्याने बॅंकांसमोर नवापेच निर्माण झाला आहे. 
जिल्ह्यात कर्जमाफीच्या कामांमध्ये गटसचिवांनी दिलेल्या माहितीमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शासनाला सर्व बॅंका, सहकार विभागाला देता आली. अजूनही कर्जमाफीचे कामकाज सुरूच आहे. असे असताना विविध कार्यकारी संस्थांची होणारी 2 टक्के मार्जिनची रक्‍कमही विविध कार्यकारी सोसायट्यांना शासनाने देणे बंद केले आहे. यामुळे गटसचिवांचे नियमित पगार होऊ शकत नाही. आठ ते दहा महिन्यापासून वेतनच नसल्याने गटसचिव उधारी उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग नसल्याने गटसचिवांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव जिल्हा गटसचिव संवर्गीकृत कर्मचारी संघटना अध्यक्ष ईश्‍वर चव्हाण, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जनरल सेक्रेटरी कांतिलाल पाटील आदींसह सर्वच गटसचिव संपात उतरले आहेत. 

अशा आहेत मागण्या 
 गटसचिवांचे पगार 10 तारखेच्या आत व्हावे 
 थांबलेले पगार नियमित व्हावेत 
 कर्जमाफी पित्यर्थ एक बक्षीस पगार द्यावा 
 कर्जमाफीचा होणारा सर्व प्रकारचा खर्च जिल्हा बॅंकेने करावा 
 गटसचिवांनी जादा पदभार सांभाळल्याचा जादा मेहनताना तत्काळ अदा करावा 
 पगार बंद असणाऱ्या सचिवांच्या पगारासाठी पगार वर्गणी त्वरित मंजूर करावी 
 
गटसचिव हा कर्जमाफी, कर्ज देण्याबाबत सहकार विभाग, शासनाला महत्त्वाची माहिती बॅंकांना पुरविणारा महत्त्वाचा घटक आहे. तरीही त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मंजूर होत नाही. दहा महिन्यापासून वेतनही दिले नाही. राज्यस्तरावर आंदोलनाबाबत इतर जिल्ह्यातील गटसचिवांच्या बैठका सुरू आहेत. 
-दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष जिल्हा गटसचिव संवर्गीकृत कर्मचारी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com