घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास खाते गोठणार! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगाव ः मलनिस्सारण प्रक्रिया (भुयारी गटार) प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सुमारे दोन कोटींचे बॅंक खाते महापालिकेचे गोठविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू न झाल्यास "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बॅंक खातेही गोठण्याची शक्‍यता आहे. 

जळगाव ः मलनिस्सारण प्रक्रिया (भुयारी गटार) प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सुमारे दोन कोटींचे बॅंक खाते महापालिकेचे गोठविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू न झाल्यास "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बॅंक खातेही गोठण्याची शक्‍यता आहे. 

"स्वच्छ भारत' अभियानांतर्गत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेला 30 कोटी 75 लाखांचा "डीपीआर'नुसार निधी मिळाला आहे. त्यातून आव्हाणे शिवारात प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वांत कमी दराच्या प्राप्त झालेल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर बुधवारी झालेल्या स्थायी सभेत ठेवला होता; परंतु सत्ताधारी भाजपने निविदेची अधिक माहिती घेण्याचे सांगून मंजुरीचा ठराव स्थगित केला होता. 

हरित लवाद समितीचा तगादा 
आव्हाणे शिवारात घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय लवाद समिती सदस्यांनी तीन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. त्यानुसार या प्रकल्पात साचलेल्या कचऱ्याची आधी विल्हेवाट लावावी. त्यानंतर नवीन प्रकल्पाची उभारणी करावी, अशा सूचना महापालिकेला दिल्या होत्या. राष्ट्रीय हरित लवाद समितीने काम सुरू करण्यासाठी तगादा लावला आहे. त्यात दोन्ही प्रस्तावांना स्थगिती ठेवल्याने विलंब होणार आहे. परिणामी प्रकल्पासाठी प्राप्त निधी असलेल्या बॅंकेचे खाते गोठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवण्याची शक्‍यता आहे. 

ऍक्‍सिस, एचडीएफसीचे खाते गोठलेलेच 
"हुडको'च्या कर्जापोटी दोन वेळा महापालिकेचे खाते गोठविण्याची नामुष्की ओढवली आहे. दुसऱ्यांदा गोठविण्यात आल्यानंतर खाते उघडण्यात आले. मात्र, ऍक्‍सिस, एचडीएफसी बॅंकेने खाते उघडण्यास नकार दिला. त्यामुळे अद्याप दोन्ही बॅंकांचे अजून खाते उघडलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ghankachra praklp bank account