घरकुल घोटाळा : आरोपी कारागृहात जात नाहीत तोपर्यंत जामिनावर सुनावणी नाही ः खंडपीठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्या पीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. 

रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्या पीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. 
या प्रकरणी पाच आरोपी धुळे जिल्हा विशेष न्यायालयाने 31 ऑगस्टला सुनावलेल्या शिक्षेच्या पहिल्या दिवसापासून किरकोळ आजारपणाच्या नावाखाली धुळे जिल्हा कारागृहात गेले नाहीत. त्यावर खंडपीठाने प्रचंड नाराजी व्यक्त केली. नंतर आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतले. राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात 49 पैकी 48 आरोपींना शिक्षा झालेली आहे. यातील काही आरोपी हे मधुमेह व रक्तदाब या आजारपणाचे कारण पुढे करीत तब्बल महिनाभरापासून जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात कसे काय राहू शकतात, असा प्रश्‍न उपस्थित करीत खंडपीठाने रुग्णालय प्रशासनास झालेल्या सुनावणीवेळी चांगलेच धारेवर धरले. 

आरोपींचे टीव्ही फुटेज द्या 
सुनावणीदरम्यान जळगाव "डीवायएसपी'तर्फे आरोपींवरील उपचाराबाबत खंडपीठात एक अर्ज दाखल करण्यात आला. त्या अर्जावर ताशेरे ओढत खंडपीठाने आरोपी उपचार घेत असलेल्या श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना नोटीस बजावली; तसेच रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज, तसेच आरोपींचा वैद्यकीय अहवाल शुक्रवारी (ता. 4) तातडीने खंडपीठात सादर करण्याचा आदेश दिला. शासनातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण बाजू मांडणार आहेत. 

या आरोपींनी मागे घेतले अर्ज 
मीना वाणी, अलका लढ्ढा, साधना कोगटा, विजय कोल्हे, सुधा काळे हे पाच आरोपी शिक्षा झाल्यापासून कारागृहात गेले नाहीत. त्यांनी दाखल केलेले जामीन अर्ज बुधवारी मागे घेतले. या प्रकरणात शुक्रवारी खंडपीठात सुनावणी होणार आहे. शासनातर्फे विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी बाजू मांडत आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. आर. आर. मंत्री, ऍड. आर. एन. धोर्डे, ऍड. महेश देशमुख, ऍड. गिरीश वाणी, ऍड. नितीन चौधरी, ऍड. जॉयदीप चॅटर्जी, ऍड. विनोद पाटील, ऍड. परेश पाटील, ऍड. अभय भोसले, ऍड. सत्यजित बोरा, ऍड. किशोर संत, ऍड. मुकुल कुलकर्णी, ऍड. विक्रम धोर्डे यांनी बाजू मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gharkul ghotala court risult