घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, देवकरांसह सर्व दोषी; सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

धुळे : राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह सर्व 48 आरोपींना धुळ्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी सव्वा वाजता हा निकाल देत सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनीही सर्वांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे. 
जळगाव पालिकेच्या राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याचा निकाल आज धुळ्याच्या विशेष न्यायालयात लागणार होता. त्यादृष्टीने स्थानिक पोलिस प्रशासनाने आवश्‍यक बंदोबस्त सकाळपासूनच तैनात केला होता. 

बचावपक्ष वकिलांची विनंती अमान्य 
दुपारी 12 वाजता न्यायालयाचे कामकाज सुरु झाले. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांना निकालापूर्वी भूमिका मांडण्यासाठी परवानगी दिली. बचाव पक्षाच्या वकिलांनी या गैरव्यवहार प्रकरणाशी त्यांच्या अशिलांचा संबंध नाही, असा दावा केला. अनेक संशयितांना आजार, व्याधी जडल्याचे कारण पुढे करत त्यांनी बचावाचा प्रयत्न केला. मात्र, सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी सर्व संशयितांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. जनतेचा पैसा हडपण्याच्या दृष्टीने त्यांनी हा प्रकार केला. हा केवळ गैरव्यवहार नव्हे तर पालिकेवर अक्षरश: अत्याचार केला आहे. जागा नसतानाही घरकुलाचा ठराव करणे, सर्व बेकायदेशीर असतानाही त्याबाबत प्रश्‍न न विचारणे हा अधिकारी व नगरसेवकांचा गुन्हा आहे. यापैकी अनेक संशयित जामीन न मिळाल्याने कारागृहात होते, त्यावेळी त्यांना कुठलाही आजार जडला नाही, त्यामुळे आत्ताच कशा व्याधी लागल्या? असे मुद्दे उपस्थित केले. 

सर्व आरोपी दोषी 
भूमिका ऐकल्यानंतर बचावपक्षाची विनंती अमान्य करत न्या. नीळकंठ यांनी सर्व आरोपींना दोषी ठरविले. तसेच स्थानिक पोलिसांना या सर्व दोषींना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांनी या आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे. निकालाने काही आरोपींना मोठा मानसिक धक्का बसला असून महिला आरोपींच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागल्याचे चित्र होते. दुपारच्या सत्रात शिक्षेवर युक्तिवाद होऊन त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्‍यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gharkul ghotala jain devkar other 48 gilti