हळदीच्या दिवशीच उपवराच्या कुटूंबीयांना घरफोडीचा चुना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जळगाव : जळगाव-औरंगाबाद रोडवर औद्योगीक वसाहतीचा विस्तारीत भाग असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. परसिरातील दोन घरांमध्ये यशस्वी घरफोडी करुन ऐवज लांबवण्यात आला असुन उर्वरीत तीन ठिकाणांवर चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुप्रीम कॉलनीतील ईदगाह मैदाना शेजारीच उपवराच्या घरी चोरट्यांनी धुडगूस घालत नववधुसाठीचे नवीन कपडे, दागिन्यांसह रोकड असा ऐवज घेवुन पोबारा केला त्या सोबतच गल्लीतील आणखी एका घरातून दोन मोबाईल आणि रोकड असा ऐवज चोरट्यांनी पळवला असुन औद्योगीक वसाहत पोलिसात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सुप्रीम कॉलनी परिसरातील ईदगाह मैदाना लागून वास्तव्याला असलेले रज्जाक शेख यांचा मुलगा सलीम शेख याचा रविवारी(ता.8) विवाह आहे. तत्पुर्वीच त्याच्या घरात तयारी सुरु होती, घराचे रंगकाम सुरु असल्याने शेख कुटूंबीयांनी घरा मागेच एक भाड्याची खोली घेवुन सर्व साहित्य या ठिकाणी ठेवले होते. नववधुला देण्यासाठी घेतलेले कपडे, साज, आणि दागिने असेही याच खोलीत ठेवण्यात आले होते. शुक्रवार(ता.6) रोजी शेख कुटूंबीय रात्रीच्या जेवणानंतर घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. पहाटे त्यांना घरात चोरी झाल्याची माहिती झाल्यावर त्यांनी खोलीकडे धाव घेतली असता घडला प्रकार समोर आला. सलीम शेख रज्जाक यांनी तक्रार दिल्यावरुन आद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

कष्टाची कमाई नेल्याचे दु:ख 
सलीम शेख रज्जाक यांच्या कुटूंबात आई मेहरुन्नीसा,वडील रज्जाक, भाऊ नुरोद्दीन, रहिम , कलीम,आदील, अहमद, अस्लम आदींच्यासह एकत्र कुटूंबात वास्तव्याला असुन बांधकाम मिस्तरी म्हणुन सर्व भाऊ काम करतात. पै-पै जोडून घर आणि नंतर मुलांचे लग्न असे कष्टासह उत्पन्नाचे नियोजन या कुटूंबीयांनी केले होते. सलीमच्या लग्नासाठी राहत्या घराला रंगकाम करण्यात येत होते. परीणामी घरा मागेच त्यांनी एकाचे पार्टीशनचे घर घेवुन तेथे घरातील सर्व साहित्यांसह लग्नाचा सामान ठेवला होता, याच खोलीत चोरट्यांनी डल्ला मारत 90 हजार रुपये रोख, 7 हजार रुपयांची नववधुसाठी घेतलेली सोन्याची मंगळपोत,कानातील टॉप्स 6 हजारांचे, नववधुसाठीचे नवीन कपडे असा एकुण 1 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज सलीम शेख रज्जाक यांच्या घरातून चोरट्यांनी लांबवला आहे. 

उपवर-वधुला आज हळद 
सलिम शेख या तरुणाला आज सुप्रीम कॉलनीत राहत्या घरीच हळद लागणार आहे, परंपरेनुसार नवरदेवच्या घरुन हळद, मेहंदीसह इतर साहित्य नववधुच्या घरी पाठवण्यात येते. आज संध्याकाळी सलीमच्या घरी हळदीचा कार्यक्रम असुन रविवार(ता.8) रोजी सकाळीच वऱ्हाड शाहुनगर येथे विवाह स्थळी येणार आहे. तत्पुर्वीच चोरट्यांनी शेख कुटूंबीयांच्या घरी चोरी करुन लाख-दिड लाखाचा चुना लावल्याने आनंदात विरजण पडले आहे. 

गल्लीत आणखी घरातही चोऱ्या 
सलीम शेख यांच्या गल्लीतील रहिवासी कलीम शेख ख्वॉंजा यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी दोन माबाईलसह घरातील हजार रुपये असा ऐवज लांबवला आहे. इतर तीन घरांच्या मुख्य दाराचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र फारसे काही मिळनू आले नसल्याने चोरट्यांना या घरातून खाली हात परतावे लागले आहे. 

Web Title: marathi news jalgaon gharphodi