काम मिळणे सोपे; टिकविण्यात "स्ट्रगल'! : अभिनेत्री श्रेया बुगडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जळगाव ः युवा पिढीमध्ये टॅलेंट खूप आहे. कोणतीही गोष्ट करणे त्यांना सहज वाटते. पण अनेकजण मुंबईत येतात आणि काम मिळण्यासाठी पैसे देत असतात; मात्र ज्यांच्या नावाने पैसे घेतले जातात, त्यांना देखील हे माहीत नसते. मुळात सिनेसृष्टीत काम मिळविण्यासाठी पैसे द्यावे लागत नसून, येथे टॅलेंट महत्त्वाचे आहे. याच आधारावर काम मिळविणे सोपे आहे; मात्र ते काम टिकवून ठेवण्यात "स्ट्रगल' असल्याचे सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांनी आज सांगितले. 

मू. जे. महाविद्यालयात आयोजित "खानदेश गॉट टॅलेंट' स्पर्धेनिमित्ताने आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्रा. मंगेश सरोदे, शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी उपस्थित होते. श्रेया बुगडे म्हणाल्या, की अल्पवयीन मुले- मुली पळून जातात. हे चित्रपट पाहून केले जात असेल तर यात संस्कार कमी पडल्याचे म्हणता येईल. अशा गोष्टींना चित्रपटसृष्टीला दोष देऊन चालणार नाही. कारण आर्मी, नेव्ही, क्रिकेटर यांच्यावर देखील चित्रपट बनले आहेत. या चांगल्या गोष्टी आत्मसात न करता वाईट गोष्टी लवकर अनुकरण करीत असतात. याला त्यांच्यावरील झालेले संस्कार अपूर्ण पडत आहेत. शिवाय, सोशल नेटवर्किंगमुळे युवा वर्गाला त्यांचे हित कशात आहे हे समजते. यामुळे मुलगी आपला जोडीदार चांगला असेल तर ती चॉईस करू शकत असल्याचे त्या म्हणाल्या. 
 
मराठी, गुजराथीतील साहित्य वेगळे 
मराठी, गुजराती व मारवाडी भाषेतून काम केले आहे. मारवाडी भाषेतून एकांकिका केल्या. तर गुजराती भाषेतून नाटक केले आहेत. दोन्ही भाषा वेगळ्या असून, साहित्य दोन्हीकडे वेगळे आहे. ती प्रक्रिया घडवून आणण्याची कला आहे. आज मराठी नाटक गुजराथीमध्ये आणले जातेय. यामुळे मराठी नाटकांचा दर्जा निश्‍चितच चांगला असल्याचे बुगडे यांनी सांगितले. 

"मी-टू'ने वाचा फुटली 
"मी-टू' याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की यातून झालेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे; हे समोर येईलच. यामुळे उशिरा का होईना पण वाचा फुटली आहे. यामुळे हे गांभीर्याने घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर विनोदी अभिनय करण्याबद्दल त्या म्हणाल्या, की हिंदी सिनेमामध्ये अनेक नावाजलेल्या विनोदी अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. मराठीत अंगाने जाड असलेल्यांना विनोदी भूमिका दिल्या जायच्या. मात्र "चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून विनोदी भूमिका साकारल्याने एक अपवाद ठरल्याचे बुगडे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon ghreya bugde