मंत्री महाजनांची "डीआरएम'शी चर्चा 

मंत्री महाजनांची "डीआरएम'शी चर्चा 

जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले. 
महापालिकेत आज सायंकाळी मंत्री महाजन यांच्या हस्ते नवीन घंटागाड्या, फिरते शौचालय, जेसीबींचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व पदाधिकारी, अधिकारी तसेच नगरसेवक महापालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेत प्रलंबित कामांसंदर्भातील समस्या तसेच सुरू असलेली कामे कोणत्या स्थिती आहेत याची सविस्तर माहिती मंत्री महाजन यांनी घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, महिला- बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे आदींसह नगरसेविका उपस्थित होते. 

मंत्री महाजन चार तास महापालिकेत 
महापालिकेत सायंकाळी सहाला नवीन घंटागाड्यांचे जलसंपदामंत्री महाजन यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर मंत्री महाजन यांनी महापौरांच्या दालनात सर्व महापालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून चार तासांत महापालिकेच्या कामकाजाचा आढावा जाणून घेतला. यात शहरातील सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम, भूमिगत गटार योजनेच्या निविदा प्रक्रिया कुठपर्यंत आली, तसेच एलईडी पथदिव्यांच्या कामांची माहिती जाणून घेतली. शंभर कोटी, पंचवीस कोटींतील सुरू असलेल्या कामांची माहिती मंत्र्यांनी जाणून घेतली. 

"तहसील'जवळ रेल्वेगेटबाबत आश्‍वासन 
महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय निघाला असता नागरिकांना पर्यायी रस्ता, सुरत रेल्वेगटवरील वाहतुकीच्या कोंडीचा विषय निघाला. त्यावर तहसील कार्यालयाजवळ रेल्वेगटबाबत चर्चा होऊन मंत्री महाजनांनी रेल्वेचे डीआरएम यादव यांच्याशी फोनवरून संपर्क करून रेल्वेगेटबाबत चर्चा केली. तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com