जलसंपदामंत्री गिरीश महाजन पैशांच्या जोरावर बोलतात : अनिल पाटलांची टीका 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन पैशांच्या जोरावर बोलतात : अनिल पाटलांची टीका 

चाळीसगाव ः "मी माझ्या राजकीय जीवनाची पंचवीस वर्षे भाजपमध्ये घातली आहे. पक्षातील रतन खत्रींमुळे मी भाजप सोडला. त्यामुळे मला भाजपमध्ये कोण कसे हे चांगले माहीत आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही जिंकू, असे जाहीररीत्या सांगणारे गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांच्या नव्हे तर पैशांच्या जोरावर बोलतात', अशी टीका जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीनिमित्ताने श्री. पाटील आज चाळीसगावला आले होते. यानिमित्ताने त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्‍याम देशमुख, जिल्हा परिषदेतील गटनेते शशिकांत साळुंखे, माजी सदस्य मंगेश पाटील, रतन साळुंखे, माजी आमदार ऍड. ईश्‍वर जाधव, योगेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आपला परिचय करून देताना आपले प्राथमिक शिक्षण चाळीसगावात झाल्याचे सांगितले. अमळनेरला राजकीय जीवनाची सुरवात झाल्यानंतर सुरवातीला भाजपमध्ये होतो. माझी उमेदवारी पक्षाकडून अधिकृतरीत्या जाहीर व्हायची बाकी असली तरी मी मात्र तयारीच्या दृष्टीने मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला आहे. पक्षातर्फे ज्या कोणाला उमेदवारी दिली जाईल, त्याचा आपण निष्ठेने प्रचार करू असे त्यांनी सांगितले. सध्या केंद्र सरकारवर सर्वसामान्य अत्यंत नाराज आहे. मी तळागाळातला सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने जनतेची नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे आपला विजय पक्का असल्याचा आत्मविश्‍वास त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दाखवला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com