युतीमुळे शिवसेनेच्या प्रचारासाठी जाणारच ः जलसंपदामंत्री महाजन 

युतीमुळे शिवसेनेच्या प्रचारासाठी जाणारच ः जलसंपदामंत्री महाजन 

जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. 
महापालिकेस नवीन घनकचरा प्रकल्पांतर्गत मंजूर 30 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास आराखड्यातून प्राप्त झालेल्या 25 नवीन 2.5 क्‍यूबी क्षमतेच्या ओला व सुका कचरा वेगवेगळा असलेल्या घंटागाड्या, दोन फिरते शौचालये आणि मागे प्राप्त झालेल्या दोन जेसीबींचे लोकार्पण महापालिकेच्या प्रांगणात जलसंपदामंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, महिला-बालकल्याण सभापती मंगला चौधरी, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे, नगरसेवक प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, चेतन सनकत, मुकुंदा सोनवणे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. 

आणखी 60 गाड्या खरेदी करू 
गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्या, फिरते शौचालय महापालिकेत दाखल झाले होते. महापालिकेच्या निधी अंतर्गत यांची खरेदी करण्यात आली. एका शौचालयात 10 सीट असून, घनकचरा प्रकल्पांतर्गत आणखी 60 नवीन घंटागाड्या व नवीन वाहने खरेदी केली जातील, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. त्यानंतर महाजन यांनी आयुक्त डांगे व महापौर भोळे यांच्याकडून शहराच्या विकासकामांबाबत आढावा घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com