निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

जळगाव : घर घेण्यासाठी माहेरून 30 लाख रुपये आणावे यासाठी निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत यांचे पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक मानसिक त्रास देत छळ करण्यात आला. पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात घडला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला साहाय्य कक्षाच्या शिफारशीनुसार औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

निवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनालीचा पतीसह सासरच्या मंडळींतर्फे माहेरून तीस लाख रुपये आणावे यासाठी छळ सुरू होता. प्रकरण कौटुंबिक असल्याने सोनाली यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला साहाय्य कक्षात लेखी अर्ज केला. अर्जानुसार पती-पत्नीसह दोघींकडील मंडळींचे समुपदेशन करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र सासरची मंडळी ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याने अखेर पीडित विवाहिता सोनाली यांनी औद्योगीक वसाहत पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत नमूद केल्या नुसार, पाच वर्षांपूर्वी 12 डिसेंबर 2013ला सोनाली यांचा जळगाव शहरातीलच किशोर गोविंदा राजपूत (रा. बालाजी पेठ, जळगाव) याच्याशी विवाह झाला. लग्नात दोन लाखांचे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य माहेरून देण्यात आले होते. लग्नानंतर चार महिने दोघांचा संसार सुरळीत चालला. त्यानंतर मात्र सासरच्या मंडळीचा त्रास वाढत गेला. 

वाद नको म्हणून सासऱ्याकडून घर 
पती व सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याने पती-पत्नी सोनाली यांच्या वडिलांच्या मालकीच्या अयोध्या नगरातील घरात वास्तव्याला गेले. तेथे काही दिवस संसार सुरळीत चालल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नणंदेकडून सतत टोचून बोलले जात होते. तेथेही त्रास झाला. याप्रकरणी पती किशोर गोविंदा पाटील, सासू सुनंदाबाई, सासरे गोविंदा रतन राजपूत, दीर विनोद (सर्व रा. बालाजी पेठ,जळगाव), कोमल राजपूत (नंदोई), सरला कोमल राजपूत (नणंद) व लक्ष्मण किसन राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: marathi news jalgaon girl dunda